श्रीलंकेत आंदोलकांनी पंतप्रधानांचे घर जाळले; Asia Cup 2022 धोक्यात

एशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडून हिसकावले जाऊ शकते.
Sri Lanka Crisis | Asia Cup 2022
Sri Lanka Crisis | Asia Cup 2022sakal
Updated on

Asia Cup 2022: एशिया कप 2022 या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरला श्रीलंकामध्ये खेळल्या जाणार आहे. यावेळेस एशिया क्रिकेट परिषदेने (ACC) श्रीलंकेकडे यजमानपद सोपवले होते. वेळापत्रकानुसार स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. परंतु श्रीलंकामध्ये प्रचंड हिंसाचारामुळे आशिया कप 2022 (Asia Cup 2022 News) धोक्यात आले आहे. महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही लोकांचा रोष कमी झालेला नाही. देशभरात प्रचंड हिंसाचार सुरू असताना राजपक्षे यांच्या घराला निदर्शकांनी आग लावली आहे. त्यामळे एशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडून हिसकावले जाऊ शकते. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे, कारण ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी तयारी करण्याची संधी मिळणार आहे. (Sri Lanka Crisis)

Sri Lanka Crisis | Asia Cup 2022
श्रीलंकेत आंदोलकांनी पंतप्रधानांचे घर जाळले; Asia Cup 2022 धोक्यात

श्रीलंकेतील अशी परिस्थिती पाहता या देशात आशिया कप 2022 चे आयोजन धोक्यात येऊ शकते. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाला जून-जुलैमध्ये 3 टी-20, 5 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करायचा आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या मालिकेवर धोक्याची घंटा वाजत आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया चषक 2022 श्रीलंकेत आयोजित न झाल्यास यजमानपद दुबईकडे सोपवण्याबाबत चर्चा होऊ शकते. 9 मे रोजी आंदोलकांनी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे घर जाळले होते.

Sri Lanka Crisis | Asia Cup 2022
शुभमन गिलची धडाकेबाज कामगिरी; क्रिकेटच्या देवाशी केली बरोबरी

एशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच सांगितले की, आशिया चषक 2022 च्या आयोजनाबाबत कोणताही निर्णय आयपीएल 2022 नंतर घेतला जाईल. आशिया चषकाचे 7 वेळा विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा 8व्या विजेतेपदावर असतील. टीम इंडियाने 2016 आणि 2018 मध्ये सलग दोन आशिया चषक जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.