Kohli vs Gambhir IPL 2023 : कोहली-गंभीरला फक्त आर्थिक दंड नको थेट निलंबन करा; माजी खेळाडूची मागणी

१० वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये हरभजनने श्रीशांतच्या श्रीमुखात भडकवल्याच्या घटनेशी गावसकर यांनी कोहली-गंभीर प्रकरणाची तुलना केली.
Kohli vs Gambhir
Kohli vs Gambhir
Updated on

नवी दिल्ली - आयपीएल सामन्यानंतर बंगळूर संघातील खेळाडू विराट कोहली आणि लखनौ संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात झालेली बाचाबाची आणि त्याचे पर्यावसन हमरीतुमरीवर येण्याची निर्माण झालेली स्थिती याबद्दल आयपीएल प्रशासनाने दोघांना मोठा आर्थिक दंड केला; परंतु अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी दंडापेक्षा निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे, असे रोखठोक मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

१० वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये हरभजनने श्रीशांतच्या श्रीमुखात भडकवल्याच्या घटनेशी गावसकर यांनी कोहली-गंभीर प्रकरणाची तुलना केली. कोहली आणि गंभीर या दोघांच्या सामना मानधनातील १०० टक्के रक्कम कापून घेण्याची शिक्षा आयपीएल प्रशासनाने केली.

Kohli vs Gambhir
IPL 2023 : गतविजेते अन्‌ उपविजेत्यांमध्ये लढाई, पांड्या आणि टीम पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक

असे प्रकार पुन्हा होऊ नयेत आणि कोणीही असे धाडस करू नये यासाठी काही सामन्यांच्या निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे, असे प्रकार संघावरही परिणाम करत असतात, असे गावसकर यांनी म्हटले आहे.

१०० टक्के सामना मानधन म्हणजे नक्की किती, असा प्रश्न करून गावसकर पुढे म्हणतात, कोहलीला जर बंगळूर संघ अंदाजे १७ कोटी देत असेल तर प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्याचा विचार करता एका सामन्यासाठी १ कोटी एवढी रक्कम फार मोठी आहे. गंभीरचे मानधन किती आहे याबाबत मला माहिती नाही; परंतु असे प्रकार पुन्हा घडू नयेत, हे महत्त्वाचे आहे.

Kohli vs Gambhir
Saroj Patil on Sharad Pawar Retirement: शरद पवारांच्या बहिणीने सुचवलं जयंतरावांचे नाव?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()