Sunil Gavaskar Virat Kohli Gautam Gambhir Spat IPL 2023 : सोमवारी 1 मे रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. या लो स्कोरिंग सामन्यात आश्चर्यकारकरित्या आरसीबीने 126 धावांचे टार्गेट डिफेंड करत लखनौचा 18 धावांनी पराभव केला. मात्र या सामन्यापेक्षा, आरसीबीच्या दमदार गोलंदाजीपेक्षा विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यातील वादाचीच तुफान चर्चा झाली. दरम्यान, मैदानावरील या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले अन् भारतीय क्रिकेट जगताची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
यामुळे बीसीसीआयने दंगेखोर खेळाडूंवर दंडाचा बडगा उगारला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांची संपूर्ण मॅच फीच दंड म्हणून कापून घेण्यात आली. तर नवीनला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला. विराट कोहलीला या भांडणामुळे एक कोटीचा फटका बदला. मात्र बीसीसीआयच्या या कारवाईवर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर हे फारसे खुष नाहीत. त्यांनी शकडो कोटी रूपये कमवणाऱ्या खेळाडूंना एखाद्या कोटीने काय फरक पडणार आहे असे म्हणत अजून कडक शिक्षा करण्याची मागणी केली.
सुनिल गावसकर स्टार स्पोट्सशी बोलताना म्हणाले की, 'मी कालचा सामना लाईव्ह पाहू शकलो नाही. मी नंतर या घटनेचे व्हिडिओ पाहिले. या गोष्टी बघायला चांगल्या वाटत नाहीत. मात्र 100 टक्के सामन्याचं मानधन कापून घेण्याने खेळाडूंना काय फरक पडणार आहे. बेंगलोर विराटला बहुदा 17 कोटी रूपये देते. जर आपण हंगामातील 16 सामन्यांसाठी 17 कोटी असे पकडले तर त्याला 1 कोटी रूपयांचा दंड झाला असेल. मात्र या 1 कोटी दंडाने विराट कोहलीला काय फरक पडेल? ही काही मोठी शिक्षा नाही.'
गावसकरांनी अशा प्रकारच्या अप्रिय घटना पुढे रोखायच्या असतील तर खेळाडू आणि स्टाफवर काही सामन्यांची बंदी घातली गेली पाहिजे असे मत व्यक्त केले. गावसकर म्हणाले की, 'मला विचाराल तर या गोष्टींसाठी असे पाऊल उचलले गेले पाहिजे की या गोष्टी पुन्हा करण्याचं धाडस कोणाचं होणार नाही. 10 वर्षापूर्वी हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यासोबत जे झालं तसं काही करण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्या खेळाडूंना काही सामन्यासाठी निलंबित केलं गेलं पाहिजे.'
गावसकर यासाठी स्लो ओव्हर रेटसाठी लावलेल्या कडक नियमांचे उदारहण देतात. ते म्हणतात की, 'स्लो ओव्हर रेटच्या नियमाचे उल्लंघन केल्यास संघांना मोठा फटका बसू शकतो. यामुळे ते तो सामना गमावू देखील शकतात. त्यामुळेच सामना सुरू असताना कायम वेळेत षटके टाकली पाहिजे हे खेळाडूंच्या डोक्यात असतं. त्यामुळे मैदानावरील भांडणे रोखण्यासाठी देखील खेळाडूंमध्ये भिती निर्माण करण्यासाठी असं काही केलं पाहिजे की त्यामुळे संघाचं नुकसान होईल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.