मुंबईच्या तिलक वर्मासाठी खुद्द सुनिल गावसकरांची 'बॅटिंग'

Sunil Gavaskar Praise Mumbai Indians Tilak Varma
Sunil Gavaskar Praise Mumbai Indians Tilak Varma esakal
Updated on

भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) याची तोंडभरून स्तुती केली. त्यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मताशी सहमती दर्शवली. रोहित शर्माने तिलक वर्मा हा भारताचा सर्व फॉरमॅटमधील फलंदाज (India All Format Batsmen) होऊ शकतो असे वक्तव्य केले होते.

Sunil Gavaskar Praise Mumbai Indians Tilak Varma
IPL 2022: नेट रनरेट कसा काढतात रे भाऊ?

तिलक वर्मा हा आयपीएलमध्ये चमकलेला एक तारा आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना यंदाच्या हंगामात 12 सामन्यात 368 धावा केल्या आहेत. जरी मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी झाली नसली तरी त्यांना काही भविष्यातील खेळाडू गवसले आहेत. तिलक वर्मा बाबत बोलताना सुनिल गावसकर म्हणाले की, 'तिलक वर्माचे टेम्प्रामेंट हे जबरदस्त आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात संघ दबावात असताना फलंदाजीला येत परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली. त्याने प्रभावित केले.'

सुनिल गावसकर पुढे म्हणाले की, 'त्याच्या भात्यात विविध फटक्यांचा भरणा आहे. याचबरोबर त्याचे एकेरी आणि दुहेरी धावा करण्यात त्याचे प्राविण्य आहे. यावरून त्याच्याकडे चांगले क्रिकेटिंग ब्रेन असल्याचे दिसते. मला वाटते की हे खूप महत्वाचे आहे. ज्यावेळी तुमच्याकडे चांगले क्रिकेटिंग ब्रेन असते. त्यावेळी तुम्ही गोष्टी तुमच्या हातात नसताना त्यातून स्वतःला सावरू शकता. तुम्ही स्वतःचे मुल्यमापन करता आणि पुन्हा धावा करण्यास सुरूवात करता.'

Sunil Gavaskar Praise Mumbai Indians Tilak Varma
सचिनच्या अर्जुनमुळं Mumbai Indians होतीय ट्रोल, काय आहे कारण?

याचबरोबर सुनिल गावसकर यांनी तिलक वर्माचे बेसिक तगडे असल्याचे सांगितले. तसेच रोहितच्या मताशी सहमती दर्शवली. गावसकर म्हणाले, 'रोहित शर्माचे तिलक वर्माबाबतचे मत योग्य आहे. तो भारताकडून सर्व फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळू शकतो. आता सर्व गोष्टी त्याच्यावर आहेत. त्याला आता जरा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याला फिटनेसवर काम करावं लागणाल आहे. बॅटिंगचे तंत्र अजून घोटवणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्वाचे की रोहित शर्माचे मत खरे करून दाखवायचे आहे.'

गावसकर तिलक वर्माच्या बॅटिंग तंत्राबाबत म्हणाले की, 'त्याचा पाया पक्का आहे. तांत्रिकदृष्ट्या तो योग्या आहे. तो चांगल्या प्रकारे बॉलच्या लाईनमध्ये येतो. त्याची बॅट सरळ खाली येते. फ्रंट फूटवर डिफेन्स करताना त्यांची बॅट आणि पॅड हे जवळ असतात. त्याचा पाया पक्का आहे. मात्र फक्त पाया पक्का असून चालणार नाही तर त्याच्या जोडीला टेम्प्रामेंटची देखील साथ हवी असते. सध्या तरी तिलक वर्माकडील बेसिक आणि टेम्प्रामेंट हे हातात हात घालून प्रवास करताना दिसत आहेत. हा प्रवास असाच पुढे सुरू रहावा अशी आशा आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.