Sunil Gavaskar Rohit Sharma IPL : आयपीएलच्या 16 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अडखळत सुरू आहे. पहिल्या दोन पराभवानंतर मुंबईने सलग तीन सामन्यात विजय मिळवला. मात्र ते पुन्हा एकदा दोन सामने गमावून बसले आहेत. संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील त्याच्या लयीत दिसत नाहीये. हाच मुद्दा पकडून भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी रोहित शर्माला एक मोलाचा सल्ला दिला.
सुनिल गावसकर इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले की, 'मी मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये काही बदल अपेक्षित करतोय. खरं सांगू का रोहित शर्माने आता थोडा वेळ विश्रांती घेतली पाहिजे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी स्वतःला फिट ठेवलं पाहिजे. तो शेवटच्या काही आयपीएल सामन्यात पुन्हा खेळू शकतो. मात्र आता त्याने विश्रांती घेतली पाहिजे. जेणेकरून त्याला थोडी उसंत मिळेल.'
गावसकर पुढे म्हणाले की, 'रोहित शर्मा कोणत्यातरी विचारात दिसतो. मला असे वाटते की तो WTC फायनलचा विचार करत असावा, मला माहिती नाही. पण या घडीला त्याने थोडी विश्रांती घ्यावी. शेवटचे तीन चार सामने खेळावे जेणेकरून तो WTC फायनलपूर्वी पुन्हा लयीत येईल.'
मुंबईने खराब सुरूवातीनंतर पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत सलग तीन सामने जिंकले. मात्र पुन्हा एकदा त्यांची गाडी पराभवाच्या खाईत अडकली आहे. सध्याच्या घडीला गुणतालिकेचा विचार केला तर त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विशेष कामगिरी करावी लागणार आहे.
याबाबत बोलताना गावसकर म्हणाले की, 'जर त्यांनी क्वालिफायरमध्ये जागा मिळवली तर तो एक चमत्कार असेल. ते सध्या ज्या स्थितीत आहेत ते जास्तीजास्त चौथ्या क्रमांकावर येऊ शकतात. मात्र यासाठी त्यांना फलंदाजी आणि गोलंदाजीत अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करावी लागणार आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.