RCB vs KKR : केकेआरनं होम ग्राऊंड अन् होम टीमची मक्तेदारी मोडली

RCB vs KKR
RCB vs KKR esakal
Updated on

Kolkata knight Riders Defeat Royal Challenger Bengaluru : केकेआरनं आरसीबीविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अय्यरनं चिन्नास्वामीवर नाणेफेक जिंकल्यानं अर्धा सामना तिथंच जिंकला होता. मात्र केकेआर अन् त्यांच्या विजयात एकच व्यक्ती आडवा येणार होता. तो म्हणजे विराट कोहली!

विराट कोहलीनं 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या जोडीला मॅक्सवेल देखील चांगली हाणामारी करण्याच्या तयारीत होता. त्यात केकेआरनं त्याला दोन जीवनदान दिली होती. केकेआर आपल्या हातानं सामन्याचं वाटोळं करून टाकणार असं वाटत होतं. मात्र सुनिल नारायणनं मॅक्सवेल नावाचा काटा दूर केला अन् केकेआरनं पुन्हा सामन्यावर पकड मिळवली.

RCB vs KKR
RCB vs KKR IPL 2024 : श्वानाच्या प्रेडिक्शनमध्ये आरसीबीला धक्का; सहा तासापूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी

केकेआरनं किंग कोहलीला फार काही न करता त्याच्या आजूबाजूच्या त्याच्या सरदारांना गारद केलं. त्यामुळे किंग कोहली एकटा लढून देखील आरसीबी 200 धावांचा टप्पा काही पार करून शकली नाही.

चिन्नास्वीमीवर जर तुम्ही नाणेफेक हरली अन् तुम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करताना 200 धावांचा टप्पा पार करता आला नाही तर तो सामना तुम्ही गमावल्यात जमा असतो. केकेआरनं हे गणित चांगलंच ओळखलं होतं. पॉवर प्लेमध्येच केकेआरनं आपली पॉवर दाखवून आरसीबापासून सामना दूर नेला.

सुनिल नारायण अन् फिल्प सॉल्टनं आरसीबीच्या जखमेवर मीठ चोळलं होतं. आधीच धावफलकावर 183 अशी तोकडी धावसंख्या होता. त्यात नारायण अन् सॉल्टनं पहिल्या 6 षटकातच 85 धावा ठोकल्या. यंदाच्या हंगामातील ही पॉवर प्लेमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

RCB vs KKR
IPL 2024 RCB vs KKR Live Score : अखेर केकेआरनेच तोडली होम ग्राऊंडवरील होम टीमची मक्तेदारी; आरसीबीचा घरच्या मैदानावर पराभव

पॉवर प्लेनंतर आरसीबी खडबडून जागी झाली. त्यांनी फिरकीची साथ घेत नारायणला अर्धशतकाआधीच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॉल्टही 30 धावा करून बाद झाला. मात्र केकेआरचा स्ट्राईक रेट इतका भारी होता की या दोन विकेट्सचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही.

केकेआरच्या दोन अय्यरनी मिळून केकेआरचा विजय निश्चित केला. पुढच्या सात षटकात 75 धावांची भागीदारी रचली. त्यात व्यंकटेश अय्यरने 50 धावांचं योगदान दिलं. व्यंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनं विजयाची औपचारिकता 19 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केली. त्यानं नाबाद 39 धावा केल्या. केकेकआरने 16.5 षटकातच आरसीबीला दाखवून दिलं की त्यांनी दिलेलं 183 धावांचा टार्गेट हे छोटं होतं.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()