Washington Sundar Injury Update : सनराईजर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हा हैदराबादचा कॅम्प सोडून जात असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडिओत वॉशिंग्टन सुंदर आपल्या हैदराबादच्या संघ सहकाऱ्यांचा निरोप घेताना दिसतोय.
त्यांच झालं अस की वॉशिंग्टन सुंदरच्या मांडीचा स्नायू दुखावला आहे. त्यामुळे तो उर्वरित आयपीएल 2023 च्या हंगामातील सर्वा सामन्याला मुकला आहे. याबाबतची माहिती खुद्द सनराईजर्स हैदराबाने आज दिली.
वॉशिंग्टन सुंदर हा सनराईजर्सने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यापैकी सर्व सामन्यात खेळला आहे. मात्र यातील सहा सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. अखेर दिल्ली विरूद्धच्या सामन्यात त्याने 24 धावा देत 3 बळी टिपले. याचबरोबर त्याने 15 चेंडूत 24 धावाही ठोकल्या. ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च खेळी ठरली. मात्र ही कामगिरी हैदराबादचा पराभव काही रोखू शकली नाही.
आयपीएलच्या 2016 च्या हंगामाची विजेती हैदराबाद 5 पराभव आणि 2 विजयासह सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्यांचा पुढचा सामना देखील दिल्ली कॅपिटल्स सोबतच अरूण जेटली स्टेडियमवर 29 एप्रिलला होणार आहे. मात्र या सामन्यात हैदराबादला वॉशिंग्टन सुंदरशिवायच मैदानावर उतरावे लागणार आहे.
दुखापती सुंदरची काही पाठ सोडत नाहीयेत. तो नुकाताच डाव्या खांद्याच्या दुखापतीतून सावरला होता. गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याचे हॅमस्ट्रिंग देखील दुखावले होते. त्यामुळे त्याला मायदेशातील टी 20 मालिकेला देखील मुकावे लागले होते. आता याच दुखापतीमुळे तो आयपीएलचा उर्वरित हंगाम देखील मुकणार आहे.
हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.