SRH vs MI Mayank Agarwal Playing 11 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलग दोन पराभवांनी सुरूवात करणारी मुंबई इंडियन्स अखेर दोन विजय मिळवत विनिंग ट्रॅकवर आली आहे. दुसरीकडे सनराईजर्स हैदराबादने देखील आपला खेळ उंचावत चार गुणांची कमाई केली आहे. आज हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. विजेता संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर उसळी घेऊ शकतो.
मात्र दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 बाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. रोहित गेल्या सामन्यात पोटदुखीमुळे संपूर्ण सामना न खेळता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला. तर मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीतून सावरत संघात खेळेल याची अजून शक्यता दिसत नाहीये. दुसरीकडे हैदराबाद समोर मयांक अग्रवालचा खराब फॉर्म ही मोठी डोकेदुखी झाली आहे.
हैदराबादचा सलामीवीर मयांक अग्रवाल यंदाच्या हंगामातील पहिल्या चार सामन्यात फेल गेला आहे. त्याने गेल्या चार सामन्यात 27, 8, 21 आणि 9 अशा धावा केल्या आहेत. अग्रवालमुळे हैदराबादच्या हॅरी ब्रुक, राहुल त्रिपाठी आणि एडिन मारक्रमवर अतिरिक्त ताण येत आहे. पंजाब किंग्जविरूद्धचा सामना जिंकल्यामुळे मारक्रम आपल्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये कोणता बदल करण्याची शक्यता नाही. मात्र अग्रवालसाठी मुंबई इंडियन्स विरूद्धचा सामना हा शेवटची संधी असेल.
मुंबईच्या प्लेईंग 11 बाबत बोलायचे झाले करत रिले मेरेडेथने डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे तो प्लेईंग 11 मध्ये खेळेल. तर दुसरीकडे पदार्पण करणारा डुआन जेनसेन केकेआरविरूद्ध महागडा ठरला होता. त्याच्या जागी रोहित बेहरनडॉर्फला परत संघात स्थान देईल किंवा अतिरिक्त फलंदाज म्हणून स्टब्सला खेळवेल. अर्जुन तेंडुलकरला देखील हैदराबादविरूद्ध अजून एक संधी मिळू शकते. त्याने गेल्या सामन्यात 2 षटकात 17 धावा किल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.