SRH vs RCB IPL 2024 : हैदराबाद 300 पार... हैदराबाद - बंगळुरू लढतीत होणार नवा विक्रम?

SRH vs RCB
Sunrisers Hyderabad Vs Royal Challengers Bengaluru SRH esakal
Updated on

Sunrisers Hyderabad Vs Royal Challengers Bengaluru IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वात यंदाच्या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळ करीत आहे. पहिल्या तीनपैकी फक्त एका लढतीत विजय मिळवल्यानंतर पुढील चारही लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांना लोळवण्यात हैदराबादला यश मिळाले.

हैदराबादने चार वेळा दोनशेच्या वर, तर तीन वेळा अडीचशेच्या वर धावसंख्या उभारत प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. हैदराबादकडून विक्रमी धावांचा ओघ कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगळूरच्या संघाचा सात पराभवांनंतर पाय खोलात गेला असून आता यापुढील प्रत्येक लढत त्यांच्यासाठी आव्हान कायम राखण्यापेक्षा प्रतिष्ठा कायम राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे.

SRH vs RCB
PCB Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पुन्हा जर तरची भाषा! अजून कशात काही नाही तरी द्विपक्षीय मालिकेबद्दल ताठर भुमिका

बंगळूरसाठी विराट कोहलीने (३७९ धावा) व हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने (३२४ धावा) धावांचा रतीब उभारला आहे. दोघांमधील रस्सीखेच यापुढेही कायम राहील. हेडच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने दिल्लीविरुद्धच्या लढतीत पॉवरप्लेमध्ये विक्रमी धावसंख्या उभारली. अभिषेक शर्मा (२५७ धावा) हेडला सलामीला तोलामोलाची साथ देत आहे. हेनरिक क्लासेन (२६८ धावा) व एडन मार्करम (१६० धावा) या दक्षिण आफ्रिकन खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. क्लासेनने चमक दाखवली असून मार्करमला कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे.

नितीशकुमार रेड्डी (११५ धावा व तीन विकेट) याने गेल्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजी तसेच फलंदाजी अशा दोन्ही विभागात ठसा उमटवला आहे. गोलंदाजी विभागात कर्णधार पॅट कमिन्स सातत्याने प्रभावी कामगिरी करीत आहे. त्याने सात सामन्यांमधून आठच्या सरासरीने नऊ फलंदाज बाद केले आहेत.

टी. नटराजने हैदराबादकडून सर्वाधिक दहा फलंदाज बाद केले आहेत. भुवनेश्‍वरकुमारच्या गोलंदाजीवर सुरुवातीला आक्रमण करण्यात आले; पण गेल्या काही सामन्यांत त्याने समाधानकारक गोलंदाजी केली आहे. मयांक मार्कंडे, शाहबाज अहमद व वॉशिंग्टन सुंदर यांनी आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.

SRH vs RCB
DC vs GT : दिल्ली गुजरातच्या आवाक्याबाहेरच! राशिद शेवटपर्यंत लढला मात्र शेवटच्या चेंडूवर मुकेश जिंकला

गोलंदाजीत सुधारणा हवी

बंगळूरकडून सर्वाधिक विकेट यश दयाल याने मिळवलेले आहेत. त्याने सात फलंदाज बाद केले आहेत; मात्र यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सध्या तो २६व्या स्थानावर आहे (ही आकडेवारी बुधवार रात्रीपर्यंतची आहे). याचाच अर्थ बंगळूरचा गोलंदाजी विभाग कमकुवत आहे. मोहम्मद सिराज, कॅमेरुन ग्रीन, लॉकी फर्ग्युसन ही स्टार मंडळी अपयशी ठरली आहेत. कर्ण शर्मा, मयांक डागर व विल जॅक्स यांच्याकडूनही निराशा झाली आहे.

विराटला साथ हवी

बंगळूरसाठी आयपीएलचा मोसम अत्यंत वाईट ठरला असला, तरी इतर लढतींमध्ये विजय मिळवण्यासाठी त्यांचा संघ प्रयत्नशील असेल; पण फलंदाजी विभागात त्याला इतर फलंदाजांकडून साथीची गरज आहे. फाफ ड्युप्लेसी (२३९ धावा), दिनेश कार्तिक (२५१ धावा), रजत पाटीदार (१६१ धावा) यांनीही सातत्याने चमकदार खेळ करायला हवा. कॅमेरुन ग्रीन, विल जॅक्स, महिपाल लोमरोर यांनी दबावाखाली खेळ उंचावण्याची गरज आहे.

सनराइजर्स हैदराबाद प्लेइंग 11- ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमज, अब्दुल समद, पॅट कमिंस (कप्तान), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, टी नटराजन

आरसीबी प्लेइंग 11- विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कप्तान), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.