Sunrisers Hyderabad | IPL
Sunrisers Hyderabad | IPLX/IPL

IPL 2024: हेड - अभिषेकचं तुफान अन् कमिन्स-मयंकचा उत्साह; पॉवर-प्लेवेळी कसं होतं SRH च्या डगआऊटमधील वातावरण, पाहा Video

DC vs SRH: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा पॉवर-प्लेमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत असताना सनरायझर्स हैदराबादच्या डगआऊटमधील वातावरण कसं होतं पाहा.
Published on

Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 35 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. शनिवारी (20 एप्रिल) झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 67 धावांनी विजय मिळवला.

सनरायझर्स हैदराबादच्या या विजयात सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी ताबडतोड फलंदाजी करत मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु, हेड आणि अभिषेक यांच्या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारत चौकार-षटकारांची बरसात सुरू केली. हे दोघे प्रत्येक षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत होते. त्यामुळे हैदराबाद संघाला त्यांनी चक्क 5 व्या षटकात 100 धावा पार करून दिल्या आणि पॉवर-प्लेच्या 6 षटकात त्यांनी संघाला 125 धावा गाठून दिल्या होत्या.

Sunrisers Hyderabad | IPL
Travis Head: कुलदीपनं रोखलं हेडचं वादळ, वाचला युसूफ पठाणचा 14 वर्षापूर्वीचा 'तो' विक्रम

डगआऊटमध्येही आनंद

हेड आणि अभिषेक पॉवर-प्लेमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असताना सनरायझर्स हैदराबादच्या डगआऊटमध्येही आनंदाचे वारे वाहत होते. संघातील सदस्यही त्यांच्या या फटकेबाजीने आश्चर्यचकीत झाल्याचे दिसत होते. याचा व्हिडिओही आयपीएलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसले की संपूर्ण सनरायझर्स हैदराबादचे डगआऊट हेड आणि अभिषेकच्या फलंदाजाचा आनंद लुटत आहेत. तसेच मयंक अगरवालही आपल्या संघसहकाऱ्यांच्या फटकेबाजीने अंत्यत उत्साही झाल्याचे दिसत आहे, तो आनंदाने सातत्याने आपल्या जागेवरून उठताना दिसत आहे.

याशिवाय हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सही खूश दिसून येत आहे. त्याच्या चेहऱ्यावरही आनंदाचे हास्य दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Sunrisers Hyderabad | IPL
Virat Kohli-Gautam Gambhir: एक झप्पी अन् विषय संपला! सामन्यापूर्वी विराट-गंभीरमध्ये रंगली गप्पांची मैफल, पाहा Video

हैदराबादचा मोठा विजय

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 266 धावा केल्या. हैदराबादकडून ट्रेविस हेडने 32 चेंडूत 89 धावांची खेळी केली. अभिषेक शर्माने 12 चेंडूत 46 धावांची खेळी केली. तसेच शाहबाज अहमदने 29 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर दिल्लीने 267 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 19.1 षटकात सर्वबाद 199 धावा केल्या.

दिल्लीकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्कने 18 चेंडूत 65 धावांची खेळी केली, तर अभिषेक पोरेलने 42 आणि कर्णधार ऋषभ पंतने 44 धावांची खेळी केली. यांच्याशिवाय अन्य कोणाला खास काही करता आले नाही. हैदराबादकडून गोलंदाजीत टी नटराजनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()