Mumbai Indians IPL 2024 : हार्दिकच्या मुंबईत रोहितच नाही तर सूर्या अन् बुमराह देखील नाराज; काय म्हणतात हर्षा भोगले?

Harsha Bhogle
Surya Kumar Yadav Jasprit Bumrah also Unhappy In Mumbai Indiansesakal
Updated on

Mumbai Indians IPL 2024 Surya Kumar Yadav Jasprit Bumbah : मुंबई इंडियन्समध्ये कॅप्टन्सीचा ड्रामा दिवसेंदिवस वेगळं वळण घेत आहे. संघात दुफळी माजल्याचे वृत्त येत असून आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबईने सलग 3 सामने गमावले आहेत. त्यातच मुंबईचे चाहते संघाला सपोर्ट करण्याऐवजी हार्दिकवर आपला सगळा राग काढत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर माजी कर्णधार रोहित शर्मा हा या हंगामानंतर मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यात आता संघातील वरिष्ठ खेळाडू जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव देखील नाराज असल्याचं समोर येत आहे.

त्यावर क्रिकेट समीक्षक आणि समालोचक हर्षा भोगले यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरून मुंबईचे बुमराह आणि सूर्या देखील नाराज असल्याचे मत व्यक्त केलं.

Harsha Bhogle
IPL 2024 GT vs PBKS : शशांक सिंगचे झुंजार अर्धशतक, पंजाबने गुजरातचा विजयी घास हिरावला

हर्षा भोगले आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले की, 'या नाटकातील सर्व कलाकारांनी मी एवढंच सांगेन की सोशल मीडियावर काय बोललं जात आहे याकडे लक्ष देऊ नका. मी हे सर्व युवा खेळाडूंना सांगतो. मात्र हे करणं सोपं नाही. मी हे करायला शिकलो आहे. मात्र मी खूप जुना व्यक्ती आहे. मी खूप अनुभवातून शिकलो. चाहत्यांचा एक दृष्टीकोण आहे. चाहते आपल्या खेळाचा आत्मा आणि ह्रदय आहेत. तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे.

भोगले पुढे म्हणाले की, 'सूर्यकुमार यादव अन् जसप्रीत बुमराहबद्दल काय? सूर्याने यापूर्वी मुंबईचे कर्णधारपद भुषवलं आहे. तो असा व्यक्ती आहे ज्याने गौतम गंभीरचंही लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने त्याला केकेआरचा उपकर्णधार केलं होतं. तुम्ही असं म्हणू शकता की मला रोहितचं नेतृत्व आवडतं मात्र जर रोहित नसेल तर मग मी कर्णधार का नाही?'

Harsha Bhogle
IPL 2024 Viewership Record : डिस्ने स्टारला छप्पर फाड के प्रतिसाद; तब्बल 35 कोटी चाहत्यांनी पाहिली आयपीएल

'जसप्रीत बुमराहबद्दल देखील तेच आहे. बुमराह म्हणेल की मी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होतो. मी उत्तम गोलंदाज आहे. मला सामन्यातील परिस्थितीत काय करायला हवं हे चांगलं कळतं. माझ्याकडे क्षमता आहे तर मी मी कर्णधार का नाही? ते नाराज आहेत. आता या सर्व गोष्टी गृहीत धरून तुम्हाला तुमचा संघ कसा जिंकेल हे पाहायचं आहे.' हर्षा भोगलेंनी या परिस्थितीतून मार्ग काढत मुंबईने आपली गाडी विजयी मार्गावर परत आणली पाहिजे असं मत व्यक्त केलं.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.