Suryakumar Yadav: 'आम्ही काय बिघडवलं, सूर्या दादा?', CSK च्या सामन्याआधी मिस्टर 360ने हे काय केलं?

MI vs CSK: मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवचा नेटमध्ये सराव करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Suryakumar Yadav | IPL 2024
Suryakumar Yadav | IPL 2024X/MIPaltan
Updated on

Suryakumar Yadav News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 29 वा सामना रविवारी (14 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणार आहे.

दरम्यान, या सामन्याआधी मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मुंबई इंडियन्सने शनिवारी (13 एप्रिल) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. त्याच्या ऑफ साईडला एक छोटा कॅमेरा ठेवलेला आहे.

Suryakumar Yadav | IPL 2024
IPL 2024: मुंबईच्या रस्त्यांवरही CSK चीच हवा! खेळाडूंची झलक टिपण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पाहा Video

मात्र सराव करताना एका आखुड टप्प्याच्या चेंडूवर बचावात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तो चेंडू बॅटची कड घेऊन कॅमेऱ्यावर आदळला.

त्यामुळे कॅमराही तुटला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओला मुंबई इंडियन्सने कॅप्शन दिले आहे की 'हमने क्या बिगाडा था सूर्या दादा (आम्ही काय बिघडवले होते, सूर्या दादा?)'

या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक कमेंट्सही येत आहेत.

Suryakumar Yadav | IPL 2024
Rohit Sharma: 'आशा आहे रोहित चेन्नईमध्ये जाईल...', माजी इंग्लंड कर्णधाराचं मोठं वक्तव्य, CSK कॅप्टन्सीबद्दलही केलं भाष्य

दरम्यान, सूर्यकुमारला गेल्या काही महिने मांडीजवळ झालेल्या शस्त्रक्रियामुळे (Groin Surgery) क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. तो मुंबईकडून सुरुवातीच्या तीन सामन्यांनाही मुकला होता. पण चौथ्या सामन्यातून त्याने पुनरागमन केले.

मात्र पुनरागमनाच्या सामन्यात तो शुन्यावर बाद झाला. परंतु गुरुवारी (11 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मात्र सूर्यकु्मारची आक्रमक फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळाली.

त्याने 17 चेंडूतच अर्धशतक झळकावले. त्याने 19 चेंडूत 52 धावांची खेळी केली होती. आता त्याच्याकडून चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही अशाच आक्रमक खेळाची अपेक्षा मुंबईला असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.