Suryakumar Yadav: सूर्याची उन्हे मावळणार? पाकचे फलंदाज हिसकावून घेणार नंबर-1चा ताज

Suryakumar Yadav T20I Rankings
Suryakumar Yadav T20I Rankings sakal
Updated on

Suryakumar Yadav T20I Rankings : सूर्यकुमार यादवची टी-20 मधील बादशाह धोक्यात आली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सूर्याने खेळाच्या छोट्या फॉरमॅटमध्ये मोठ्या संघांना पराभूत केले होते. त्यामुळेच त्याला वनडे आणि कसोटीतही संधी देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या सूर्याला आता टी-20 मध्येही नंबर-1ची खुर्ची गमावण्याचा धोका आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानच्या डोक्यावर पुन्हा एकदा नंबर-1 चा मुकुट सजला जाऊ शकतो.

Suryakumar Yadav T20I Rankings
IPL 2023 : धोनीच्या चेन्नईचा झंझावात संजूची राजस्थान रोखणार?

आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादवचे एकूण 906 गुण आहेत. तो अजूनही टी-20 मध्ये नंबर 1 फलंदाज आहे. पहिल्या स्थानाच्या शर्यतीत त्याच्या आणि रिझवानमधील अंतर 100 गुणांपेक्षा कमी झाले आहे. रिझवानने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या देशांतर्गत टी-20 मालिकेत 98 धावांची खेळी खेळली. ज्याचा थेट फायदा त्यांना झाला आहे. रिझवान आता 798  वरून 811 गुणांवर पोहोचला आहे.

Suryakumar Yadav T20I Rankings
IPL 2023 : 4 चौकार ... 5 षटकार... तुफानी खेळीनंतर जेसन रॉयला BCCIने ठोकला दंड; बालिश कृत्यासाठी झाली शिक्षा

जरी सूर्यकुमार यादव एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला असला आणि कसोटी क्रिकेटमध्ये मिळालेल्या एकमेव संधीचा तो फायदा उठवू शकला नसला, तरी आंतरराष्ट्रीय टी-20 मधील त्याची चमक कमी झालेली नाही. जानेवारीमध्ये झालेल्या भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेपर्यंत त्याचा फॉर्म चांगला होता. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका सुरू झाल्यानंतर त्याचा फॉर्म खराब झाला.

ताज्या आयसीसी टी-20 क्रमवारीत बाबर आझम तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पाकिस्तान-न्यूझीलंड टी-20 मालिकेत शतक झळकावणारा किवी फलंदाज मार्क चॅपमनने 45 स्थानांची झेप घेतली आहे. तो 35 व्या स्थानावर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.