Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

MI vs SRH: सनराझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शतक करून मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिल्यानंतर सूर्यकुमारने पत्नीला व्हिडिओ कॉल करत आनंद साजरा केला.
Suryakumar Yadav Video
Suryakumar Yadav VideoX/MIPaltan
Updated on

Suryakumar Yadav Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा (IPL) 55 वा सामना सोमवारी (6 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सने विजय मिळवला.

मुंबईच्या या विजयात मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 51 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांसह 102 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

Suryakumar Yadav Video
IPL 2024, Video: चावलानं हेडला कॅच आऊट, तर क्लासेनला क्लिन-बोल्ड करत SRH ला दिलेला धक्का; 'हा' विक्रमही केला नावावर

दरम्यान, या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टी देखील उपस्थित होती. त्यावेळी सूर्यकुमारने आधी तिला मैदानातूनच हात केला. नंतर या शतकाचा आनंद शेअर करण्यासाठी त्यांनी व्हिडिओ कॉल केला.

या व्हिडिओ कॉलवर बोलताना सूर्यकुमारने त्याच्या पत्नीसह त्याच्या शतकाचा आनंद व्यक्त केला. ते कॉलवर बोलत असतानाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Suryakumar Yadav Video
IPL 2024: सूर्यकुमारचं रेकॉर्डब्रेक शतक, तर तिलकसह रचली विक्रमी पार्टनरशीप; MI vs SRH सामन्यातील 4 खास विक्रम

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर हैदराबादने मुंबई समोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. त्यांनी 31 धावांतच 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांची जोडी जमली. त्यांनी मुंबईचा डाव सावरण्याबरोबरच संघाला विजयही मिळवून दिला.

एका बाजूने सूर्यकुमार आक्रमक खेळत असताना दुसऱ्या बाजू तिलकने संयमी खेळ करत सांभाळली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 143 धावांची भागीदारी केली. तिलकने 32 चेंडूत 37 धावांवर नाबाद राहिला. मुंबईसाठी सूर्यकुमारने विजयी षटकार मारत शतक पूर्ण केले.

तत्पुर्वी सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 173 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. तसेच कमिन्सने 35 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.