मुंबई : आयपीएलच्या 17 व्या सामन्यात (IPL 2022) आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनराईजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना रंगला. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय हैदराबादच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. त्यांनी पॉवर प्लेमध्येच चेन्नईला दोन धक्के दिले. त्यांचे दोन्ही सलामीवीर पॉवर प्लेमध्ये गाशा गुंडाळून पॅव्हेलियनमध्ये पोहचले होते. यातील टी नटराजनने (T Natarajan) ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) उडवलेली दांडी डोळ्याचे पारणे फेडणारी होती.
सातत्याने पॉवर प्लेमध्ये प्रभावी मारा करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने चेन्नईचा सलामीवीर रॉबिन उथप्पाला 15 धावांवर बाद केले. त्यानंतर पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने ऋतुराजला एका अप्रतिम चेंडूवर बाद केले. सध्या या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्याच्या सहाव्या षटकातील पहिलाच चेंडू नटराजनने ऋतुराजच्या पुढ्यात टाकला. चेंडू आपल्या टप्यात असल्याने ऋतुराजने फ्रंट फूटवर येत तो खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋतुराज येथेच फसला. नटराजनचा हा चेंडू इन स्विंग झाला आणि ऋतुराजच्या बॅट पॅड गॅपमधून थेट स्टंम्पवर जाऊन आदळला. हा चेंडू टाकताना नटराजनच्या चेंडूची सिम पोजिशन अचूक होती. त्याची ही गोलंदाजी पाहून नटराजन हा दुखापतीतून सावरून टीम इंडियात परतण्यासाठी सज्ज झाला असल्याचे दिसते.
चेन्नईचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर त्यांची धावगती मंदावली. दरम्यान, मोईन अली आणि अंबाती रायुडूने डाव सावरण्याचा प्रयत्न करत तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र मोक्याच्या क्षणी चेन्नईच्या विकेट पडल्या. रायुडू 27 धावा करून बाद झाला तर मोईन अलीची 48 धावांची खेळी मारक्रमने संपवली. त्यानंतर आलेला शिवम दुबे 3 आणि महेंद्रसिंह धोनी 3 धावा करून माघारी परतले. अखेर रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 23 धावांची खेळी करून संघाला 150 च्या जवळ पोहचवले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.