T20 World Cup : T-20 वर्ल्ड कपमध्ये पंत-सूर्याच्या खेळण्यावर टांगती तलवार... 'या' खेळाडूमुळे होणार पत्ता कट?

Virender Sehwag on Shivam dube Rishabh Pant Suryakumar Yadav : आयपीएल 2024 नंतर लगेचच टी-20 वर्ल्ज कप होणार आहे. आणि आयपीएलच्या या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वर्ल्ड कपचे तिकिटेही मिळणार आहेत.
T20 World Cup 2024 India Squad
Virender Sehwag on Shivam dube Rishabh Pant Suryakumar Yadavsakal
Updated on

T20 World Cup 2024 India Squad : इंडियन प्रीमियर लीग 2024 दरम्यान अनेक भारतीय खेळाडू टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी आपली ताकद दाखवत आहेत. यादरम्यान महान सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही कोणते खेळाडू जे आयपीएलमधून थेट वर्ल्ड कपमध्ये खेळतील याच्याबाद्दल भविष्यवाणी केली आहे.

T20 World Cup 2024 India Squad
IPL 2024 : डबल-हेडरनंतर Points Table मोठी उलथापालथ! मुंबईने घेतली झेप, RCB अडचणीत, CSK लाही धक्का

आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे, त्यानंतर 1 जूनपासून वर्ल्ड कप सुरू होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वर्ल्ड कपचे तिकिटेही मिळणार आहेत. ज्या यादीत ऋषभ पंत ते सूर्यकुमार यादव यांसारख्या बड्या खेळाडूंच्या नावांचाही संभाव्य म्हणून समावेश आहे. पण याआधी टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

सेहवाग म्हणाला की, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांना शिवम दुबेकडून कडवी टक्कर मिळत आहे. शिवम दुबे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.

T20 World Cup 2024 India Squad
LSG vs GT : चालू सामन्यात DRS वरून राडा, कर्णधार गिल अन् गुजरातचे खेळाडू अंपायरशी भिडले

क्रिकबजशी बोलताना सेहवाग म्हणाला की, ज्या प्रकारे शिवम दुबे आयपीएलमध्ये खेळत आहे. माझ्या मते, त्याचे टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीट निश्चित झाले पाहिजे. दुबेने आता या शर्यतीत श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव किंवा ऋषभ पंत अशा अनेक खेळाडूंवर दबाव आणला आहे? उर्वरित खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. माझ्या मते, पुढे जाण्याचा हा एकमेव मार्ग असावा.

दरम्यान सेहवागने निवडकर्त्यांना विनंती केली आहे की संघात फक्त त्याच खेळाडूंचा समावेश करावा त्याचा आता फॉर्म उत्कृष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.