Team India T20 World Cup Squad : यंदा टी-20 वर्ल्ड कप 2024 खेळला जाणार त्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची लवकरच घोषणा केल्या जाऊ शकते. या निवडीत आयपीएल 2024 मधील खेळाडूंची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, आयपीएल 2024 च्या 24 सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. खराब फॉर्मशी झगडत असलेली यशस्वी जैस्वाल या सामन्यात चांगली कामगिरी करेल, अशी चाहत्यांना आशा होती, मात्र तसे झाले नाही.
यशस्वी जैस्वाल गुजरातविरुद्ध 24 धावा करून बाद झाला. त्याला उमेश यादवने आऊट केले. आतापर्यंतचा हा हंगाम यशस्वीसाठी खूपच खराब गेला आहे. त्याने त्याच्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये फक्त 63 धावा केल्या आहेत. ज्यात 24 धावा हा त्याचा सर्वोत्तम धावसंख्या आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच घोषणा केली होती की, रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल आणि अशा परिस्थितीत तो सलामीवीर राहील. आता त्याचा जोडीदार कोण असेल हा प्रश्न आहे.
या शर्यतीत अनेक खेळाडू असले तरी सर्वात मोठी स्पर्धा आहे गिल आणि जैस्वाल यांच्यात आहे, जे गेल्या वर्षभरात सतत या पदावर खेळत आहेत. पण, शुभमन गिलची कामगिरी देखील आतापर्यंत काही विशेष झाली नाही. परंतु त्याचे आकडे जैस्वालपेक्षा चांगले आहेत.
युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालचा 5 डावात 24, 5, 10, 0, 24 असा स्कोअर आहे. म्हणजे 5 डावात फक्त त्याने 63 धावा केल्या. गेल्या हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून 600 हून अधिक धावा करून इतिहास रचणाऱ्या जैस्वालची अशी कामगिरी आश्चर्यकारक आहे. या युवा फलंदाजाचे फॉर्ममध्ये येणे भारतीय संघासाठी देखील महत्त्वाचे आहे. कारण यशस्वी जयस्वालकडे रोहित शर्मासह सलामीच्या फलंदाजीसाठी आवश्यक असलेली स्फोटक क्षमता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.