T20 World Cup 2024 Team India Squad : भारतात सध्या आयपीएल 2024 चा थरार सुरू आहे. यानंतर 1 जूनपासून होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 वर सर्वांचे लक्ष आहे. कारण आयपीएल या स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यास कोणत्याही खेळाडूला वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकते.
सर्व संघाना कोणत्याही परिस्थितीत 1 मे पर्यंत वर्ल्ड कपचा संघ जाहीर करायचा आहे. अशा परिस्थितीत पूर्वार्ध म्हणजेच पहिला एक महिना प्रत्येक खेळाडूसाठी खूप महत्त्वाचा असतो. या हंगामातील पहिल्या पाच सहा सामन्यात भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या हंगामात तुफानी कामगिरी करत रिंकू सिंगने टीम इंडियात आपली जागा पक्की केली होती. पण आता तर त्याच्यासारखा दुसरा खेळाडू आयपीएलमध्ये तयार झाला आहे. त्यामुळे त्याची जागेवर धोका निर्माण झाला आहे.
खरं तर, आपण शिवम दुबेबद्दल बोलत आहोत जो टीम इंडियासाठी एक उत्तम प्लस पॉइंट ठरू शकतो. तो एक डावखुरा फलंदाज तसेच मध्यमगती गोलंदाज आहे. गेल्या दोन वर्षांत त्याचे फलंदाजीचे पराक्रम आयपीएलमध्ये दिसून आले, त्यानंतर तो टीम इंडियातही परतला.
आता आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे आहे. त्याने मंगळवारी गुजरातविरुद्ध 23 चेंडूत 51 धावांची शानदार खेळी केली. यानंतर टीम इंडियाला आणखी एक धोकादायक फिनिशर मिळाला आहे का, अशी चर्चा सुरू झाली.
गेल्या काही महिन्यांमध्ये रिंकू सिंगनेही टीम इंडियाच्या टी-20 संघात आपले स्थान पक्के केले आहे. मात्र शिवम दुबेने असाच फॉर्म सुरू ठेवला तर निवड समितीला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रिंकू सिंगशिवाय तो धोकादायक फिनिशरही ठरू शकतो.
एवढेच नाही तर तो गोलंदाजीतही करत आहे. त्यामुळे टीम इंडियात त्याचे स्थान निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्या दृष्टीने शिवम रिंकूसाठी धोका बनू शकतो.
शिवम दुबे बद्दल बोलायचे तर, त्याने भारतासाठी 1 वनडे आणि 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत. 2019 नंतर तो थेट 2023 मध्ये संघात परतला. या कालावधीत त्याने कठोर सराव केला.
पण आयपीएल 2022 मध्ये सीएसकेमध्ये सामील झाल्यावर त्याचे नशीब बदलले. त्याने संघासाठी उपयुक्त ठरला. आयपीएलमध्ये 30 च्या सरासरीने आणि 140 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 53 सामने खेळल्यानंतर त्याच्या नावावर 1191 धावा आहेत. त्याने चार विकेट्सही घेतल्या आहेत.
आयर्लंड आणि अफगाणिस्तान मालिकेव्यतिरिक्त तो भारताकडून आशियाई क्रीडा स्पर्धेतही खेळला होता. आयपीएल 2022 मध्ये शिवमने 11 सामन्यात 289 धावा केल्या होत्या आणि 2023 मध्ये शिवमने 16 सामन्यात 418 धावा केल्या होत्या. आगामी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये तो टीम इंडियासाठी उत्कृष्ट फिनिशरची भूमिकाही बजावू शकतो. ही स्पर्धा 1 जून ते 29 जून या कालावधीत अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदावर खेळली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.