T20 World Cup India Squad : RCB च्या 'या' खेळाडूंना मिळणार वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात संधी?

फाफ डु प्लेसिस हा आयपीएलमध्ये आरसीबीचा कर्णधार आहे, पण या संघाची ओळख विराट कोहली आहे.
T20 World Cup Team India squad
T20 World Cup Team India squad Newssakal
Updated on

T20 World Cup 2024 Team India Squad : टी-20 वर्ल्ड कप 2024 आता जवळ येत आहे. आणि यांचा पहिला सामना 1 जून रोजी होणार असला तरी भारतीय संघ 5 जून रोजी पहिली मॅच खेळणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकर केल्या जाईल. आता टी-20 वर्ल्ड कप भारतीय संघात सहभागी होणारे खेळाडू कोण असतील याबाबत अटकळ बांधली जात आहे.

फाफ डु प्लेसिस हा आयपीएलमध्ये आरसीबीचा कर्णधार आहे, पण या संघाची ओळख विराट कोहली आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ते खेळाडू कोण आहेत, जे यंदाच्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ शकतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया....

T20 World Cup Team India squad
T20 World Cup India Squad : टी-20 वर्ल्ड कपमधून जैस्वालचा पत्ता कट... कोण असणार कर्णधार रोहीतचा जोडीदार?

यामध्ये पहिले नाव आहे विराट कोहलीचे. कोहलीबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की, निवडकर्ते त्याच्या वर्ल्ड कपच्या संघात समावेश करण्याबाबत विचार करत आहेत, परंतु सध्या त्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे आणि तो आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

विराट कोहलीने पाच सामन्यात 316 धावा केल्या असून त्यात एक शतक ठोकले आहे. भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकच टी-20 शतक झळकावणाऱ्या कोहलीच्या नावावर आता आयपीएलमध्ये 8 शतके आहेत.

एवढेच नाही तर विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावाही केल्या आहेत. अशा स्थितीत त्याच्याकडे दुर्लक्ष करणे सध्या तरी शक्य दिसत नाही, इतर निवड समिती काय विचार करतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.

T20 World Cup Team India squad
MI vs RCB : उत्सुकता शिगेला वानखेडेवर भिडणार विराट-बुमराह! जाणून घ्या कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग-11

विराट कोहलीनंतर, आणखी एक खेळाडू जो वर्ल्ड कपसाठी जाणाऱ्या टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याचा दावेदार आहे तो म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. सिराजने या आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबीसाठी चांगली कामगिरी केलेली नाही, पण तो ज्या प्रकारचा गोलंदाज आहे, त्याची दखल नक्कीच घेतली जाईल.

विशेषत: अशा वेळी जेव्हा मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असेल आणि तो वर्ल्ड कप संघात सहभागी होऊ शकणार नाही. वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहेत आणि वेगवान गोलंदाज अमेरिकेत बांधलेल्या नवीन मैदानातही आपली प्रतिभा दाखवू शकतात.

T20 World Cup Team India squad
Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या भावाला अटक... फसवणूक अन् पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप

भारतीय संघाची लवकरच होणार घोषणा

कोहली आणि सिराज यांच्याशिवाय आरसीबीसाठी चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू आहेत, परंतु सध्या त्यांच्या नावाचा विचार करणे शक्य वाटत नाही. कारण वर्ल्ड कप संघात केवळ 15 खेळाडूंची निवड होणार आहे. मात्र येत्या काळात निवड समिती भारतीय संघाची घोषणा करतील, तेव्हाच कोणत्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे, हे स्पष्ट होईल. त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.