IPL 2022 : टाटा-बीसीसीआयच्या युतीनं चिनी विवोला तोटा

यंदा बीसीसीआय होणार मालामाल; प्रायोजकत्वाच्या कमाईचा आकडा हजारांच्या पार
Tata IPL 15 season BCCI gets 1000 crore sponsorship Vivo IPL
Tata IPL 15 season BCCI gets 1000 crore sponsorship Vivo IPL
Updated on

IPL 2022 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यंदा आयपीएलच्या निव्वळ प्रायोजकत्वातून एक हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई करणार आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार आहे. आजपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामात बीसीसीआयला १००० कोटींची प्रायोजक रक्कम मिळाली आहे.

यावेळी बीसीसीआयने टाटा समूहाशी टायटल स्पॉन्सर म्हणून करार केला आहे. त्याच वेळी, दोन सहयोगी प्रायोजकदेखील आयपीएलला मिळाले आहेत, यावरून आयपीएल किती मोठी झाली आहे, याचा प्रत्यय येतो. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने अलीकडेच ‘रूपे’ आणि ‘स्विगी इस्टामार्ट’ यांच्यासोबतही आयपीएलचे केंद्रीय प्रायोजक म्हणून नवीन करार जाहीर केला आहे. त्यामुळे बोर्डाने प्रथमच हंगामासाठीचे सर्व नऊ प्रायोजकत्व स्लॉट भरले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, बीसीसीआयने ‘रूपे’ आणि ‘स्विगी’सोबत वार्षिक ४८-५० कोटी रुपयांचा करार केला आहे. दुसरा फायदा बीसीसीआयला टायटल स्पॉन्सरशिप डीलमधून मिळत आहे. जरी टाटा समूह टायटल स्पॉन्सरशिपसाठी ३३५ कोटी रुपये देत आहे, जे विवो देत असलेल्या रकमेपेक्षा कमी असले तरीही, बीसीसीआय यंदा सुमारे ३०-४० टक्के अधिक कमाई करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार अशा प्रकारे हस्तांतरित करण्यात आला आहे की विवोला सर्व तूट भरून काढावी लागणार आहे.

त्यामुळे बीसीसीआयला केवळ विवोकडून कराराची रक्कम मिळणार नाही, तर आयपीएल २०२२ आणि आयपीएल २०२३ च्या सामन्यांच्या संख्येत झालेल्या वाढीच्या प्रमाणात पैसेही मिळतील. आगामी दोन हंगामात सामन्यांची संख्या वाढल्यामुळे विवोने आयपीएल २०२२ साठी ४८४ कोटी रुपये आणि आयपीएल २०२३ साठी ५१२ कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे पुढील दोन हंगामांसाठी विवो बीसीसीआयला एकूण ९९६ कोटी रुपये देणार होते. आता टाटा समूहाने याच कालावधीसाठी बीसीसीआयसोबत केवळ ६७० कोटी रुपयांचा करार केला आहे, ज्यामुळे तोटा विवोला सोसावा लागणार आहे.

दरम्यान, याआधी बीसीसीआयला कोरोना काळात विवो या चीनी कंपनीसोबतचा करार मोडीत काढावा लागला होता. सीमारेषेवरुन भारत - चीन यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर भारतात चीनविरोधात वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा

इतकेच नाही तर करारानुसार, विवो बीसीसीआयला ‘हस्तांतरण शुल्क’ देखील देईल. ‘ओप्पो’ने जेव्हा त्यांचे अधिकार ‘बायजू’ला हस्तांतरित केले होते तेव्हा त्यांनाही हस्तांतर शुल्क भरावे लागले होते. या उप-शीर्षक प्रायोजकत्व स्लॉटमुळे बीसीसीआयला ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा होईल. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात बीसीसीआय मालामाल होणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.