Cheteshwar Pujara : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग मोठ्या दिमाखात सुरू आहे. त्यानंतर भारतीय संघ 7 जूनपासून द ओव्हलवर ऑस्ट्रेलियासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार आहे. मात्र या सामन्यासाठी कोणत्याही संघाने आपल्या खेळाडूंची घोषणा केलेली नाही.
पण याच दरम्यान भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजाराबद्दल एक खास बातमी समोर आली आहे. IPL 2023 च्या मध्यात चेतेश्वर पुजाराकडे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
इंग्लिश कौंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारावर मोठी जबाबदारी आली आहे. काउंटी चॅम्पियनशिपच्या या मोसमात तो ससेक्सचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. गेल्या वर्षी त्याने इंग्लिश कौंटीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याची कामगिरी पाहून ससेक्सने पुजाराला कर्णधार बनवले आहे. खुद्द चेतेश्वर पुजाराने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी चेतेश्वर पुजारा ससेक्सकडून कौंटी क्रिकेट खेळला होता. कौंटी क्रिकेटमधील हा त्याचा दुसरा हंगाम आहे. 2022 साली त्याने चांगली फलंदाजी करताना 13 डावात 109.40 च्या सरासरीने 1094 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 शतके झळकावली.
गतवर्षी कौंटी चॅम्पियनशिपमध्ये पुजाराची सर्वोच्च धावसंख्या 232 होती. तो ससेक्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याची कामगिरी पाहता ससेक्स क्रिकेटने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. पुजारा गेल्या वर्षी रॉयल लंडन कपमध्येही खेळला होता.
ससेक्स 6 एप्रिलला कौंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये त्यांच्या मोहिमेला सुरुवात करेल. चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखालील संघ डरहमविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. उभय संघांमधील हा सामना होव्ह येथे होणार आहे.
दुसरीकडे, पुजाराबद्दल बोलायचे झाले तर अलीकडच्या काळात त्याला फारसे यश मिळालेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान त्याने 6 डावात केवळ 140 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी 28 होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.