IPL 2023 : चाहत्यांना मोठा धक्का! रोहित अन् विराट टूर्नामेंट मध्येच सोडणार; मोठे कारण आले समोर

team india test cricketers have to leave for wtc final before ipl 2023 playoffs virat kohli and rohit sharma
team india test cricketers have to leave for wtc final before ipl 2023 playoffs virat kohli and rohit sharma sakal
Updated on

IPL 2023 : आयपीएल 2023 दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा आयपीएल 2023 ची स्पर्धा मध्येच सोडणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळल्या जाणार आहे. शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती लवकरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची निवड करेल.

team india test cricketers have to leave for wtc final before ipl 2023 playoffs virat kohli and rohit sharma
Sachin Tendulkar Birthday: सचिनला अंजली वहिनी कशा भेटल्या? क्रिकेटच्या बादशहाची फिल्मी लव्हस्टोरी..

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड 23 किंवा 24 मे रोजी टीम इंडियाच्या काही टेस्ट क्रिकेटर्ससह लंडनला रवाना होणार आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, 'राहुल द्रविड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला रवाना होईल. काही कसोटी क्रिकेटपटू त्यांच्या आयपीएल संघ वचनबद्धतेची पूर्तता करून निघून जातील.

जर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे संघ आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकले नाहीत, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचीही नावे या यादीत जोडली जाऊ शकतात.

team india test cricketers have to leave for wtc final before ipl 2023 playoffs virat kohli and rohit sharma
IPL 2023: "टूर्नामेंटमध्ये आमची सुधारणा नाही..." पराभवानंतर कर्णधार नितीश राणा संघावर भडकला

श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या जागी अजिंक्य रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सूर्यकुमार यादवकडे अद्याप इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याचा पुरेसा अनुभव नसल्यामुळे निवडकर्ते WTC फायनलसाठी अजिंक्य रहाणेला परत बोलावण्याची शक्यता आहे.

केएल राहुल रोहित शर्मासोबत ओपनिंगसाठी सज्ज आहे, ज्यामुळे शुभमन गिलला मधल्या फळीत स्थान शोधण्यास भाग पाडले जाऊ शकते. उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय शार्दुल ठाकूरही संघाचा भाग असू शकतो.

WTCच्या अंतिम सामन्यासाठी हे असू शकतात भारतीय १६ खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, जयदेव उनाडकत, उमरन मलिक, जयदेव उनाडकत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.