आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी फारसे दिवस राहिले नाही. आगामी टी-20 वर्ल्ड कप 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळला जाणार आहे. या वर्ल्ड कपची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे, पण दरम्यान एक मोठी बातमी समोर आली. खरंतर टी-20 वर्ल्ड कपला पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. यानंतर आता पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, उत्तर पाकिस्तानमध्ये असलेल्या आयएस-खोरासानकडून वर्ल्ड कपदरम्यान कॅरेबियन देशांना धोका आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने टी-20 वर्ल्ड कपसह जगभरातील मोठ्या कार्यक्रमांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.
पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे आणि चाहत्यांनी आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याची मागणी सुरू केली आहे. याशिवाय पाकिस्तानी टीमचा व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टीम पाकिस्तानी सैन्यासोबत ट्रेनिंग करताना दिसत आहे. यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर वेस्ट इंडिज क्रिकेटचे सीईओ जॉनी ग्रेव्ह्स म्हणाले की, आम्ही ज्या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवले जातील तेथील अधिकाऱ्यांशी जवळून काम करत आहोत. वर्ल्ड कपबाबत कोणताही धोका नाही आणि आम्ही सर्व प्रकारे नियोजन करत आहोत. ज्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. एवढेच नाही तर सर्व संघांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कपमध्ये सहभागी सर्व देशांना आश्वासन दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.