T20: राशिदने निवडले Top 5 खेळाडू; धोनी, रोहितला स्थान नाही !

rashid khan
rashid khan
Updated on
Summary

भारताच्या दोन वेगळ्या खेळाडूंना पसंती

ICC आयोजित T20 World Cup 2021 ची १७ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ तयारी करत आहेत. २०२० मध्ये विश्वचषक होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा आणि पुढच्या वर्षी असा सलग दोन वर्षी टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. यंदाच्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. पण कोरोनाच्या भीतीपोटी या स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहेत. T20 मध्ये अनेक बडे खेळाडू आहेत. त्यापैकी राशिद खानने त्याला आवडणारे top 5 खेळाडू निवडले. त्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माचा समावेश नसला तरी भारताच्या दोन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

rashid khan
Video : नारायण...नारायण! विराट-एबीचा सेम टू सेम बोल्ड

राशिदच्या Top 5 खेळाडूंच्या यादीत पहिलं नाव भारताचा कर्णधार विराट कोहली याचं आहे. विराटचा खेळ हा पिचच्या वातावरणावर अवलंबून नसतो. तो पिच पाहून स्वत:चा खेळ कसा असावा हे ठरवत नाही. तो स्वत:च्या फटक्यांवर विश्वास ठेवतो आणि दमदार खेळी करण्याची क्षमता राखतो, असं राशिद म्हणाला. यादीतील दुसरा खेळाडू म्हणून राशिदने न्यूझीलंडच्या केन विल्यमसनची निवड केली. विल्यमसन हा अत्यंत हुशार खेळाडू असून त्याच्या नावावर ५ हजारापेक्षा जास्त धावा आहेत. यादीतील तिसरा खेळाडू म्हणजे एबी डिव्हिलियर्स. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो धोकादायक फलंदाज आहे. डावाच्या कोणत्याही टप्प्यात तो वेगाने धावा काढू शकतो. तसेच तो कोणत्याही गोलंदाजाला कसेही फटके मारू शकतो, असं राशिद म्हणाला.

Virat-Kohli-Team-India
Virat-Kohli-Team-India

या यादीतील शेवटचे दोन खेळाडू निवडण्याची वेळ आल्यावर त्याने दोन अष्टपैलू खेळाडूंची निवड केली. भारताचा हार्दिक पांड्या आणि विंडिजचा कायरन पोलार्ड या दोघांची त्याने निवड केली. पोलार्डच्या नावे टी२० क्रिकेटच्या सर्व स्पर्धांमध्ये मिळून एकूण ११ हजारांपेक्षाही जास्त धावा आहेत. हार्दिकच्या स्ट्राईक रेट १४२च्या आसपास आहे. राशिदच्या मते, शेवटच्या चार-पाच षटकात तब्बल ८०-९० धावा करण्याची पात्रता या दोन खेळाडूंकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.