BCCI च्या एका नियमामुळे U-19 विश्वविजेत्या संघातील 8 खेळाडू IPLला मुकणार?

U-19 World Cup विजेत्या संघातील या 8 खेळाडूंना IPL चे दार बंदच?
U-19 World Cup Wining Indian Team 8 Player may Miss IPL 2022 auction
U-19 World Cup Wining Indian Team 8 Player may Miss IPL 2022 auctionesakal
Updated on

मुंबई: भारताच्या U19 संघाने U19 वर्ल्डकप (U-19 World Cup 2022) पाचव्यांदा जिंकण्याचा पराक्रम वेस्ट इंडीजमध्ये करून दाखवला. या संघातील अनेक खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले. त्यामुळे या संघातील बरेच खेळाडू आयपीएलच्या यंदाच्या लिलावात (IPL 2022 Auction) धुमाकूळ घालतील असे अनेकांना वाटले होते. मात्र भारताच्या U19 संघातील तब्बल 8 खेळाडूंच्या आड बीसीसीआयचा (BCCI) एक नियम आला आहे. (U-19 World Cup Wining Indian Team 8 Player may Miss IPL 2022 auction Because of one BCCI Rule)

U-19 World Cup Wining Indian Team 8 Player may Miss IPL 2022 auction
विराट - रोहितला एकटं सोडा रे : गावसकर

बीसीसीआयच्या या नियमानुसार निदान एक प्रथम श्रेणी सामना किंवा लिस्ट A चा सामना खेळेलेल्याच U19 संघातील खेळाडूंना आयपीएल लिलावात सहभागी होता येतं. जर त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसेल तर त्यांना 19 वर्ष पूर्ण होईपर्यंत वाट बघावी लागते. या नियमामुळे विश्वविजेच्या U19 भारतीय संघातील विकेट किपर दिनेश बना (Dinesh Bana), उपकर्णधार एस. राशीद (Shaik Rasheed), डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमार (Ravi Kumar), अष्टपैलू निशांत सिंधू (Nishant Sindhu), सिद्धार्थ यादव, सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi), मानव पारख आणि गर्व सांगवान यांना फटका बसणार आहे. यातील बऱ्याच खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

U-19 World Cup Wining Indian Team 8 Player may Miss IPL 2022 auction
IPL 2022: विराटने आरसीबी का सोडली नाही?

दरम्यान, बीसीसीआयने या बाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात देशांतर्गत क्रिकेट फारसे झालेले नाही. त्यामुळे बोर्डातील अनेक अधिकाऱ्यांना या नियमात सूट द्यावी असे वाटते. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची स्पर्धा रणजी ट्रॉफी येत्या 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. जर या खेळाडूंना त्यांच्या राज्याच्या संघांनी आपल्या रणजी संघात स्थान दिले तरी ते 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएल लिलावावासाठी (IPL 2022 Mega Auction) पात्र होणार नाहीत.

बीसीसीआयचे माजी वरिष्ठ अधिकारी रत्नाकर शेट्टी (Ratnakar Shetty) याबाबत म्हणाले की, 'या खेळाडूंना प्रथम श्रेणी आणि लिस्ट A सामने खेळायला मिळाले नाहीत हे दुर्दैवी आहे. देशांतर्गत क्रिकेटचा एक हंगाम कोरोनामुळे वाया गेला. मला असे वाटते की बीसीसीआयने ही विशेष परिस्थिती लक्षात घ्यावी. या परिस्थितीमुळे खेळाडूंचे नुकसान होऊ नये. संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यांची संधी हिरावून घेऊ नये.'

U-19 World Cup Wining Indian Team 8 Player may Miss IPL 2022 auction
फ्लॉवरने PSL ऐवजी IPL 2022 Auctionला दिले महत्व; घेतला ब्रेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.