आयपीएलच्या साखळी सामन्याचा उद्या अखेरचा दिवस आहे आणि आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आजच अपेक्षित आहे. आयपीएलमध्ये प्रभाव पाडणारे वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि मोहसिन खान यांच्या निवडीची शक्यता असून शिखर धवन, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या यांची निवड जवळपास निश्चित वाटत आहे.
अष्टपैलू हार्दिक पंड्या गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर खेळलेला नाही; परंतु या आयपीएलमध्ये त्याने तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. गुजरात संघाचे नेतृत्व करताना त्याने काही सामन्यात गोलंदाजीही केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे आणि आयपीएल २९ मे रोजी संपत आहे. हार्दिकचा गुजरात संघ क्वॉलिफायर-१ हा सामना खेळणार असून त्यात विजय मिळवल्यास त्याचा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.
१५ जून रोजी भारतीय संघ इंग्लंडमध्ये शिल्लक असलेला कसोटी सामना खेळण्यास रवाना होणार आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमरा, श्रेयस अय्यर हे प्रमुख खेळाडू कोणत्याही परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खेळणार नाहीत. जून महिन्यातच भारतीय संघ आयर्लंडमध्ये दोन
ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपदासाठी शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांच्यात चुरस असेल. गतवर्षी श्रीलंकेत धवनने नेतृत्व केले होते. यंदा आयपीएलमध्ये हार्दिकने आपल्या नेतृत्वाची छाप पाडलेली असल्यामुळे त्यालाही पसंती मिळू शकते.
अर्शदीपला संधी मिळणार?
पंजाब संघातून खेळणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ‘डेथ ओव्हर’मध्ये कमालीचा प्रभावी ठरत आहे. त्यामुळे त्याचाही विचार निवड समिती निश्चितच करेल, असे सांगण्यात येत आहे.
कार्तिकला अधिक पसंती?
बंगळूर संघातून खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने या आयपीएलमध्ये भलतीच आक्रमक फलंदाजी करून आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. फिनिशर म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात आहे. संजू सॅमसनसह त्याचीही निवड अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.