IPL 2024 Rishabh Pant : पंतसाठी अविस्मरणीय खेळी ; दिल्ली कॅपिटल संघाचे संचालक गांगुलींकडून कौतुक

चेन्नईविरुद्ध रिषभ पंतने केलेली खेळी केवळ अविस्मरणीय होती आणि ती कायमस्वरूपी एका वेगळ्या कारणासाठी लक्षात ठेवली जाईल, असे गौरद्गगार दिल्ली कॅपिटल संघाचे संचालक सौरव गांगुली यांनी काढले.
IPL 2024 Rishabh Pant
IPL 2024 Rishabh Pantsakal
Updated on

विशाखापट्टणम : चेन्नईविरुद्ध रिषभ पंतने केलेली खेळी केवळ अविस्मरणीय होती आणि ती कायमस्वरूपी एका वेगळ्या कारणासाठी लक्षात ठेवली जाईल, असे गौरद्गगार दिल्ली कॅपिटल संघाचे संचालक सौरव गांगुली यांनी काढले.

जीवघेण्या कार अपघातानंतर केवळ दैवी चमत्कारामुळे वाचलेल्या आणि त्यानंतर डॉक्टरांसह सर्वांच्या प्रयत्नांमुळे, तसेच स्वतःच्या अथक मेहनतीमुळे दीड वर्षानंतर मैदानात परतलेला पंत आता केवळ तंदुरुस्तच झालेला नाही तर पूर्वीच्या फॉर्ममध्ये परतला आहे. चेन्नईविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात पंतने ३२ चेंडूत ५१ धावांची अफलातून खेळी साकार केली. त्यामुळे १९१ धावा करणाऱ्या दिल्ली संघाला हा सामना जिंकता आला.

या सामन्यानंतर ‘एक्स’वरून गांगुली यांनी पंतला शाबासकी दिली. ते म्हणतात, ‘या अगोदर तू अशा अनेक अफलातून खेळी केल्या असशील आणि या पुढेही करशील; परंतु या खेळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कायमस्वरूपी लक्षात राहील अशी ही खेळी आहे.’ आत्मविश्वास मिळवण्याकरिता त्याला एका अफलातून खेळीची गरज होती, ती पंतने संघ अडचणीत असताना साकार केली.

१२ लाखांचा दंड

एकीकडे आत्मविश्वासाचा खिसा एका अफलातून खेळीने भरला असताना पंतचा दुसरा खिसा मात्र रिकामा झाला. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार म्हणून निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल त्याला १२ लाखांचा दंड करण्यात आला. दिल्लीचा संघ दोन षटके मागे होता. त्यामुळे १९ आणि २० व्या षटकांत सीमारेषेवर पाचऐवजी चारच क्षेत्ररक्षक उभे करता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.