Kohli Vs Gambhir : मैदानावर कोहली-गौतमच्या भांडणावर यूपी पोलिसांचे ट्विट व्हायरल

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची चर्चा सर्वत्र जोरदार चर्चेत आहे त्याचाच...
Virat Kohli And Gautam Gambhir Fight
Virat Kohli And Gautam Gambhir Fight
Updated on

UP Police Tweet On Virat Kohli Vs Gautam Gambhir : यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची चर्चा सर्वत्र जोरदार चर्चेत आहे. त्याचाच हवाला देत उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकांना वाद घालण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लखनौमध्ये 1 मे रोजी झालेल्या सामन्यात वाद झाला होता.

Virat Kohli And Gautam Gambhir Fight
GT vs DC : इशांत शर्माची दमदार गोलंदाजी, गुजरातला 130 धावांचे आव्हानही झेपले नाही

तो संदर्भ वापरून यूपी पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले होते, आमच्यासाठी कोणतीही घटना ’कोहली आणि गंभीर ही बाब नाही. यूपी पोलिसांनी लोकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 डायल करण्याचे आवाहन केले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, वादविवाद टाळा, आम्हाला कॉल करण्यामध्ये नाही. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 डायल करा.

Virat Kohli And Gautam Gambhir Fight
Ishan Sharma : हार्दिकचे नाबाद अर्धशतक, तेवतियाही तापला होता मात्र इशांतने सगळ्यांना केलं गार

आरसीबीचा मुख्य फलंदाज कोहली आणि लखनऊ संघाचा मार्गदर्शक गंभीर यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर वादावादी झाला. या कमी धावसंख्येच्या सामन्यात आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला.

या दोघांनाही मंगळवारी आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामन्याच्या शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊचा गोलंदाज नवीन-उल-हक आणि कोहली एकमेकांशी वाद घालताना दिसले. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते. त्यावेळेस दोघांच्या बाचाबाची झाली. आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने त्यांना एकमेकांपासून वेगळे केले.

यानंतर गंभीरने मायर्सला कोहलीशी बोलण्यापासून रोखले. काही वेळातच गंभीर कोहलीच्या दिशेने जाताना दिसला. त्यानंतर लखनऊचा जखमी कर्णधार केएल राहुलसह त्याच्या इतर खेळाडूंनी त्याला रोखले. यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार वादीवाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.