Video: अजब गजब पद्धतीने अंबाती रायुडू झाला दुखापतग्रस्त

Ambati-Rayudu-
Ambati-Rayudu-
Updated on
Summary

रायडू चेंडू चुकवण्यासाठी खाली वाकला अन्...

IPL 2021 in UAE: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांच्या सामन्यात IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण चेन्नईचा हा निर्णय काहीसा फसला. पहिल्या ५ षटकांत चेन्नईची अवस्था ३ बाद १८ अशी झाली होती. त्यातही वाईट बाब म्हणजे, ३ गड्यांव्यतिरिक्त त्यांचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूदेखील अजब पद्धतीने दुखापतग्रस्त झाला आणि तंबूत परतला.

Ambati-Rayudu-
IPL 2021 : दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात काय-काय घडलं

न्यूझीलंडचा अडम मिल्न गोलंदाजी करत होता. त्यावेळी CSK ची अवस्था २ बाद २ धावा अशी होती. मिल्नच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडूने फलंदाजीला सुरूवात केली. मिल्नने टाकलेला चेंडू अंगावर येतोय असं पाहून रायुडू थोडासा बाचकला. त्याने डोळे पटकन मिटले आणि तो विचित्रपणे खाली वाकला. पण नेमका चेंडू अपेक्षेप्रमाणे उडाला नाही. त्यामुळे चेंडू रायुडूच्या हेल्मेटजवळ लागला. त्यामुळे नाईलाजाने त्याला मैदान सोडून तंबूत परतावे लागले.

दरम्यान, या सामन्यासाठी मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा नव्हे तर कायरन पोलार्डने केले. पोलार्ड टॉसच्या वेळी आला तेव्हा तो नक्की काय बोलणार याकडे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे लक्ष होते. तेव्हा पोलार्ड म्हणाला, रोहित ठिक आहे. मी केवळ आजच्या सामन्यापुरता कर्णधार आहे. पुढच्या सामन्यात तोच टॉसला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.