Vijay Mallya: 'कर्ज घेताना नेमकं काय वाटत होतं?', विराट अन् RCB बाबत त्या ट्वीटवर विजय मल्ल्या ट्रोल

Virat Kohli: रॉयल चॅलंजर्स बंगळुरू आणि विराट कोहली यांच्याबाबत आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यापूर्वी विजय मल्ल्या यांनी एक ट्वीट केले आहे, ज्या सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
Vijay Mallya
Vijay Mallya
Updated on

Vijay Mallya Post: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात अहमदाबादला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बंगळुरू संघाचे माजी संघमालक विजय मल्ल्या यांनी विराट कोहलीबाबत एक ट्वीट केले आहे, ज्यावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

मल्ल्या हे बंगळुरू संघाची मालकी असलेल्या युनायटेड स्पिरिटचे माजी चेअरमन आहेत. बंगळुरू संघांची मालकी मिळवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. दरम्यान, बंगळुरू या संघाकडून विराट कोहली पहिल्या हंगामापासून खेळत आहे.

Vijay Mallya
RR vs RCB Eliminator : इलिमिनेटर सामन्यात आरसीबी कच खाते; विराटच्या संघाची कशी आहे प्ले ऑफमधील कामगिरी?

याबाबतच मल्ल्या यांनी ट्वीट केले की 'जेव्ही मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझीसाठी आणि विराट कोहलीसाठी बोली लाववेली तेव्हा माझी अंतःप्रेरणा मला सांगत होती की यापेक्षा अधिक चांगला पर्याय मी निवडूच शकत नाही. माझी अंतःप्रेरणा सांगत आहे की आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. संघाला शुभेच्छा.'

विजय मल्ल्या यांच्या ट्वीटनंतर अनेकांनी ते कर्ज बुडवून फरार झाल्याची आठवण करून देत ट्रोल केले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की 'जेव्हा कर्ज घेतलेले, तेव्हा तुमच्या अंतःप्रेरणा काय होती?'

विजय मल्ल्या यांच्यावर अनेक बँकांकडून जवळपास ९००० कोटींचे कर्ज घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे. ते फरार होऊन युरोपला गेले असल्याचे सांगण्यात येते.

Vijay Mallya
RR vs RCB: कोहली IPL मध्येही किंग! 29 धावा करताच 'असा' ऐतिहासिक पराक्रम करणारा बनेल पहिलाच क्रिकेटर

बंगळुरू संघ प्लेऑफमध्ये

बंगळुरू संघासाठी आयपीएल 2024 मधील कामगिरी चढ-उताराची राहिली आहे. त्यांनी पहिल्या 8 सामन्यात केवळ एक विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचे आव्हान जवळपास संपले असल्याचे म्हटले जात होते. परंतु, नंतरच्या 6 सामन्यात बंगळुरूने कमालीचे पुनरागमन करत विजय मिळवला. त्यामुळे बंगळुरून प्लऑफमध्येही स्थान मिळवण्यात यश मिळवलं.

बंगळुरूने आयपीएल 2024 मध्ये साखळी फेरीतील 7 सामन्यांत विजय आणि 7 सामन्यांत पराभव स्विकारला. त्यामुळे 14 गुणांसह त्यांनी पाँइंट्स टेबलमध्ये चौथा क्रमांक मिळवत विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.