CSK vs RR MS Dhoni : 1 चेंडू 5 धावा अन् समोर होता धोनी, मात्र आता तो काळही राहिला नाही

CSK vs RR MS Dhoni
CSK vs RR MS DhoniESAKAL
Updated on

CSK vs RR MS Dhoni : चेन्नईला विजयासाठी 1 चेंडूत 5 धावांची गरज होती. समोर होता धोनी! धोनीसाठी ही स्थिती काय नवी नव्हती त्याने अनेकवेळा शेवटच्या चेंडूवर षटकार मारत सामना संपवला होता. याच षटकात धोनीने दोन षटकार खेचत सामना सीएसकेच्या पारड्यात आणला होतो. यावेळी मात्र धोनीला षटकार मारण्यात अपयश आले. संदीप शर्माने धोनीला हात खोलण्याची संधी न देता शेवटचा चेंडू चांगला टाकला. अन् सीएसके फॅन्सकडून जल्लोषाची संधी हिरावून घेतली. राजस्थानने ठेवलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 7 बाद 172 धावांपर्यंतच मजल मारता आली.

CSK vs RR MS Dhoni
CSK vs RR IPL 2023 : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईला दिली 3 धावांनी मात

राजस्थानने चेन्नईसमोर 176 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करत असताना चेन्नईला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. ऋतुराज गायकवाड 8 धावा करून बाद झाला.

यानंतर मात्र डेवॉन कॉन्वे आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. परंतु या दोघांना म्हणावी तशी धावगती राखता आली नाही अजिंक्य रहाणेने 163 च्या स्ट्राईक रेटने 19 चेंडूत 31 धावा केल्या. मात्र कॉन्वेला आपला स्ट्राईक रेट चांगला ठेवता आला नाही. त्याने 38 चेंडूत 50 धावा केल्या.

मात्र ही जोडी फुटल्यानंतर शिवम दुबे (8), मोईन अली (7) अन् अंबाती रायुडू (1) यांना फारशी चमक दाखवता आली नाही. यानंतर मात्र महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजा या सीएसकेच्या कसलेल्या जोडीने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी आक्रमक अर्धशतकी भागीदारी रचत सामना 6 चेंडूत 21 धावा असा आणला.

CSK vs RR MS Dhoni
Suryakumar Yadav ICC : स्थान अबाधित! धावांच्या दुष्काळात सूर्याला ICC Ranking चा दिलासा, तरी बाबरकडून धोका

संदीप शर्मा टाकत असलेल्या शेवटच्या षटकात धोनीने दोन षटकार मारत व्हिंटेज धोनीचे दर्शन घडवले. अखेर सामना 1 चेंडू 5 धावा असा आला. धोनी स्ट्राईकवर होता. मात्र संदीप शर्माने धोनीला षटकार मराण्याची संधी दिली नाही. राजस्थानने चेन्नईवर 3 धावांनी निसटता विजय मिळवला.

धोनीने 17 चेंडूत 32 धावा ठोकल्या. यात तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. तर रविंद्र जडेजाने दोन षटकार आणि एक चौकार ठोकत 15 चेंडूत 25 धावा केल्या. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 59 धावांची झुंजार भागीदारी केली. राजस्थानकडून रवी अश्विन आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर संदीप शर्माने 1 विकेट घेत 3 षटकात 30 धावा दिल्या.

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 20 षटकात 8 बाद 175 धावा केल्या. सलामीवीर जॉस बटलरने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला देवदत्त पडिक्कलने 38 तर अश्विन आणि हेटमायरने प्रत्येकी 30 धावा करत चांगली साथ दिली. सीएसकेकडून आकाशदीप, तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.