IPL 2023: 'लोकांना वाटते की माझी T20 कारकीर्द...', सलग दोन शतके झळकावल्यानंतर विराटने दिलं चोख प्रत्युत्तर

विराटने हैदराबाद आणि गुजरातविरुद्ध शतके ठोकून टीकाकारांना दिले उत्तर
Virat Kohli RCB IPL 2023
Virat Kohli RCB IPL 2023
Updated on

Virat Kohli RCB IPL 2023 : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये एकही शतक होत नाही आणि विराट कोहलीने सलग दोन शतके झळकावली आहे.

आयपीएलमध्ये तो आता एकामागोमाग दोन शतके झळकावणाऱ्या निवडक खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे, तर त्याने ख्रिस गेलचा आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडला आहे. आयपीएलमधील सातवे आणि सलग दुसरे शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने टीकाकारांवर निशाणा साधला आहे. त्याने अशा लोकांवर निशाणा साधला आहे जे कोहलीची टी-20 कारकीर्द संपल्याचे अनेक दिवसांपासून वक्तव्य करत आहेत.

Virat Kohli RCB IPL 2023
Shubman Gill IPL 2023: आमच्यासाठी चांगली बॅटिंग केलीस! सचिनचं भन्नाट ट्विट

कोहलीचा स्ट्राइक-रेट आणि मधल्या षटकांमध्ये फिरकीविरुद्धची फलंदाजी यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते, परंतु आता त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध शतके ठोकून टीकाकारांना उत्तर दिले आहे.

लीग फेरीच्या शेवटच्या सामन्यानंतर एका मुलाखतीत कोहली म्हणाला, अनेकांना वाटते की माझे टी-20 क्रिकेट आता संपत आहे, पण मला असे अजिबात वाटत नाही. मला वाटते की मी पुन्हा माझे सर्वोत्तम टी-20 क्रिकेट खेळत आहे. मी फक्त आनंद घेत आहे.

Virat Kohli RCB IPL 2023
IPL 2023: प्लेऑफमधून बाहेर गेल्यावर RCB कर्णधार टीमवरच बरसला; 16व्यांदा स्वप्नभंग होण्याचेही सांगितले कारण

कोहली टी-20 करिअरमध्ये 12 हजार धावांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आयपीएल, आंतरराष्ट्रीय आणि सर्व प्रकारच्या टी-20 सह, कोहलीने 374 सामन्यांमध्ये 41.40 च्या सरासरीने आणि 133.35 च्या स्ट्राइक रेटने 11,965 धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि 91 अर्धशतकांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()