Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Virat Kohli Shubman Gill: गुजरात आणि बेंगळुरू यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यात चकमक पाहायला मिळाली होती.
Virat Kohli Shubman Gill
Virat Kohli Shubman GillSakal
Updated on

Virat Kohli - Shubman Gill Video: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ४५वा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात झाला. या सामन्यात बेंगळुरूने ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

बेंगळुरूच्या विजयात विराट कोहलीनेही मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, याच सामन्यात विराट आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यांच्यात गमतीशीर चकमक झाल्याचेही पाहायला मिळाली.

Virat Kohli Shubman Gill
T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

या सामन्यात गुजरातने बेंगळुरूसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहली सलामीलाच फलंदाजीला उतरला होता. यावेळी एका क्षणी गिल त्याच्या संघाचे क्षेत्ररक्षण लावत होता. पण त्याचवेळी अचानक विराट मागून आला आणि त्याने गिलला धक्का दिला.

यावेळी गिलनेही त्याला हसून प्रतिक्रिया दिली. त्यानंतर ते एकमेकांशी काहीतरी बोलतानाही दिसले. त्याआधीही बेंगळुरू फलंदाजीला उतरण्यापूर्वी या सामन्यात गुजरातच्या डगआऊटमध्ये गिलला बसलेला पाहून विराट तिथे जाऊनही काहीतरी बोलताना दिसला होता.

या दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच या दोघांमध्ये दिसलेल्या ब्रोमान्सचेही सध्या कौतुक होत आहे.

Virat Kohli Shubman Gill
CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या होत्या. गुजरातकडून साई सुदर्शनने 49 चेंडूत 84 धावांची खेळी केली, तर शाहरुख खानने 30 चेंडूत 58 धावांची खेळी केली. गोलंदाजीत बेंगळुरुकडून स्वप्निल सिंग, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्यानंतर २०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग बेंगळुरूने 16 षटकात 1 विकेट गमावत पूर्ण केला. बेंगळुरूकडून विल जॅक्सने 21 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकारांसह 100 धावांची नाबाद खेळी केली. तसेच विराट कोहलीने 44 चेंडूत 70 धावांची खेळी केली. फाफ डू प्लेसिसने 24 धावा केल्या. गुजरातकडून एकमेव विकेट साई किशोरने मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.