Virat Kohli IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 15व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध एक विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचला आणि लखनौने अवघड वाटणारा विजय खेचून आणला. या सामन्यात आरसीबीचा संघ भलेही हरला असेल, पण अनुभवी फलंदाज विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्याच षटकापासून विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये होता. या सामन्यात त्याने 44 चेंडूत 4 षटकार आणि तब्बल 6 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. कोहलीने आपल्या खेळीच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या यादीत विराटने अलीकडेच अॅरॉन फिंचला मागे टाकले आहे. विराटने आता 363 सामन्यांच्या 346 डावांमध्ये 11490 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 शतके झळकली आहेत, तर त्याने 87 अर्धशतके केली आहेत.
या यादीत अव्वल स्थानावर वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने 455 डावात 14562 धावा केल्या आहेत. त्याचवेळी पाकिस्तानच्या शोएब मलिकचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. मलिकने 474 डावात 12528 धावा केल्या आहेत.
या यादीत वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने 55 डावात 12175 धावा केल्या आहेत. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोहलीनंतर पाचव्या क्रमांकावर अॅरॉन फिंचचे नाव येते. फिंचने 376 डावात 11392 धावा केल्या आहेत. याशिवाय सहाव्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर हा त्याचा एकमेव जोडीदार आहे. वॉर्नरने 11337 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे लखनौ संघाविरुद्ध 61 धावा करून विराट कोहली आयपीएलमध्ये सर्व संघांविरुद्ध अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यांच्या आधी ऋतुराज गायकवाड यांनी हा पराक्रम केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.