Virat Kohli RR vs RCB : विराट कोहलीने रचला इतिहास; 8 हजारी मनसबदारी मिळवणारा ठरला पहिला खेळाडू

Virat Kohli IPL Record : विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्यानावावर केला आहे.
Virat Kohli
Virat Kohli IPL Record RR vs RCBesakal
Updated on

Virat Kohli IPL Record : विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात संदीप शर्माला चौकार मारत आपल्या आठ हजार धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये 8000 धावा करणारा विराट कोहली हा इतिहासातील पहिलाच फलंदाज झाला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणालाच जमलेली नाही.

विराट कोहली हा आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण करणारा देखील पहिला फलंदाज ठरला होता. विराटनंतर आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर शिखन धवन आहे. त्याने 6769 धावा केल्या आहेत.

Virat Kohli
RR vs RCB : राजस्थानने आरसीबीचा विजयी रथ रोखला; एलिमिनेटरमधूनच केलं पॅक अप

आयपीएलमधील धावांचे माईल स्टोन

  • आयपीएलमध्ये सर्वात आधी 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज - अॅडम गिलख्रिस्ट

  • आयपीएलमध्ये सर्वात आधी 2000 धावा पूर्ण करणारा फलंदाज - सुरेश रैना

  • आयपीएलमध्ये सर्वात आधी 3000 धावा पूर्ण करणारा फलंदाज - सुरेश रैना

  • आयपीएलमध्ये सर्वात आधी 4000 धावा पूर्ण करणारा फलंदाज - विराट कोहली

  • आयपीएलमध्ये सर्वात आधी 5000 धावा पूर्ण करणारा फलंदाज - सुरेश रैना

  • आयपीएलमध्ये सर्वात आधी 6000 धावा पूर्ण करणारा फलंदाज - विराट कोहली

  • आयपीएलमध्ये सर्वात आधी 7000 धावा पूर्ण करणारा फलंदाज - विराट कोहली

  • आयपीएलमध्ये सर्वात आधी 8000 धावा पूर्ण करणारा फलंदाज - विराट कोहली

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या फलंदाजाना बांधून ठेवण्यात राजस्थानला यश आलं. बोल्टनं कर्णधार फाफ ड्युप्लेसिसला 17 धावांवर बाद केलं.

पॉवर प्लेनंतर आरसीबीने अर्धशतक पूर्ण केलं. विराट कोहलीने देखील आपल्या 8000 धावा पूर्ण केल्या. मात्र पॉवर प्ले नंतर युझवेंद्र चहलने 24 चेंडूत 33 धावा करणाऱ्या विराट कोहलीला बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com