Virat Kohli: 'क्रिकेटमधला सी पण कळत नाही...', विराटचे बालपणीचे कोच भडकले; स्ट्राईक रेटवर..

Virat Kohli Coach: विराट कोहलीचे बालपणीचे कोच टीकाकारांवर भडकले असून त्यांनी कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

Virat Kohli Coach: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र असे असले तरी त्याच्या फलंदाजीच्या स्ट्राईक रेटवरून त्याच्यावर टीका होत आहे. विराटने सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 300 हून अधिक धावाही केल्या आहेत. यात त्याच्या शतकाचाही समावेश आहे.

परंतु, असे असले तरी त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध केलेल्या या शतकानंतरही त्याच्या स्ट्राईट रेटवर टीका झाली. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून विराटने 67 चेंडूत शतक केले होते. आयपीएल इतिहासातील हे सर्वात धीम्या गतीचे शतक ठरले. त्या सामन्यात बेंगळुरूने 183 धावा केल्या होत्या.

दरम्यान आता विराटवर होत असलेल्या टीकेवर त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी विराटवर टीका करणाऱ्यांना फटकारले आहे.

Virat Kohli
PBKS vs SRH: भूवीची रणनीती अन् क्लासेनची सुपरफास्ट स्टम्पिंग, असा झाला शिखर धवन 'स्टंप आऊट'; पाहा Video

इंडिया न्यूजशी बोलाताना राजकुमार शर्मा म्हणाले, 'काही लोक मुर्खासारखं बोलत आहेत. असं वाटते की त्यांना सामन्याची गरज, सामन्याची परिस्थिती काय होती आणि संघ कसा संघर्ष करत आहे, हे कळत नव्हते. त्यांना फक्त चर्चेत राहायचे असते.'

'कारण जर तुम्ही कोणत्याही सामन्य खेळाडूबद्दल बोलला, तर तुम्ही बातम्यांमध्ये झळकणार नाही, पण जर तुम्ही विराट कोहलीसारख्या खेळाडूबद्दल बोलता, तेव्हा त्याची बातमी होते.'

इतकेच नाही, तर राजकुमार शर्मा यांनी असाही दावा केला की विराटविरुद्ध एक लॉबी अजेंडा चालवत आहेत.

Virat Kohli
Weightlifting Video: मूर्ती लहान, पण कीर्ती महान! अवघ्या 9 वर्षांच्या अर्शियाने उचलले 75 किलो वजन

ते म्हणाले, 'एक लॉबी आहे जी अजेंडा चालवत आहे, पण त्यांच्या अजेंड्याचा चाहते आणि खरे विश्लेषक म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही. हे पाहा राजा हा नेहमीच राजा असतो. ज्याला क्रिकेटमधील फक्त सी जरी माहित असेल, तो कधीही असे मुर्खासारखं काही करणार नाही.'

विराटने सध्या आयपीएल 2024 स्पर्धेत 5 सामन्यांत 146.30 च्या सरासरीने 316 धावा केल्या आहेत. तो आयपीएल 2024 स्पर्धेत 300 धावा करणारा पहिलाच फलंदाज आहे.

मात्र तो जरी चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असला तरी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ विजयासाठी संघर्ष करत आहे. बेंगळुरूने आत्तापर्यंत आयपीएल 2024 स्पर्धेत 5 सामन्यांतील 4 सामन्यात पराभव स्विकारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.