गांगुली वादानंतर विराट कोहली अडकला नव्या गोंधळात! चालु IPL मध्ये BCCIने केली मोठी शिक्षा

आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीवर बीसीसीआयने घेतली ॲक्शन...
virat kohli fined 10 percent of match fees after rcb vs csk
virat kohli fined 10 percent of match fees after rcb vs csk
Updated on

Virat Kohli Fined : आयपीएल 2023 च्या 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने 227 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पण बराच वेळ सामना रोखून धरल्यानंतरही शेवटी हा सामना आरसीबीने गमावला.

आरसीबीच्या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचा स्टार फलंदाज विराट कोहली या सामन्यात केवळ 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी या सामन्यातील पराभवानंतर विराटसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.

virat kohli fined 10 percent of match fees after rcb vs csk
IPL 2023 : फाफ अन् मॅक्सवेलच्या मेहनतीवर धोनीच्या पठ्ठ्याने पाणी फेरले! शेवटच्या बॉल दणदणीत विजय

सीएसकेविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर बीसीसीआयने विराट कोहलीला दंड ठोठावला आहे. विराटवर आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आयपीएलने आपल्या चालू मीडिया रिलीझमध्ये सांगितले की विराट कोहलीला बेंगळुरूमध्ये CSK विरुद्धच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विराटने कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला आहे.

virat kohli fined 10 percent of match fees after rcb vs csk
IPL 2023: इशान किशनच्या फलंदाजीने हैराण सुहाना खान; आऊट होताच केले असे कृत्य...

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर CSK ने प्रथम फलंदाजी करताना 226 धावा केल्या. सीएसकेकडून शिबम दुबे आणि डेव्हन कॉनवे यांनी शानदार खेळी खेळली. शिवमने 52 धावा केल्या. त्याचवेळी कॉनवेने 83 धावांची खेळी केली.

पर्वतासारख्या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीने सुरुवात केली आणि पहिल्याच षटकात विराट पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (76) यांनी आरसीबीसाठी उत्कृष्ट फलंदाजी केली, परंतु या दोन खेळाडूंशिवाय आरसीबीचा एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. या कारणामुळे संघाला 8 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.