Virat Kohli-Gautam Gambhir Photo : कोहली अन् गंभीरचा 'तो' फोटो चर्चेत; दिल्ली पोलिसांनीही केली मजेशीर पोस्ट

Virat Kohli-Gautam Gambhir Photo : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Virat Kohli-Gautam Gambhir Photo
Virat Kohli-Gautam Gambhir Photo
Updated on

Virat Kohli-Gautam Gambhir Photo : सध्या सगळीकडे आयपीएलची धूम पाहायला मिळत आहे. यादरकरम्यान शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात विकेट्सनी पराभाव केला. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, त्यामागचं कारण विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील जूना वाद होता. मात्र सोशल मीडियावार या सामन्यानंतर तुफान मीम्स व्हायरल होत आहेत.

गेल्या वर्षी आयपीएलमध्ये दोन संघाच्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गंभीर यांच्यात वाद झाला होता. तेव्हा गंभीर लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटर होता. या भांडणाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. इतकेच नाही तर २०१३ मध्ये देखील दोन खेळाडूंमध्ये वाद झाला होता, तेव्हा गंभीर केकेआर संघाचा कर्णाधार होता. त्यामुळे काल झालेल्या सामन्यात देखील हे दोघे एकमेकांना भिडणार का अशी चर्चा पाहायला मिळत होती. मात्र या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला.

Virat Kohli-Gautam Gambhir Photo
RCB vs KKR: वेंकटेश अय्यरने ठोकला IPL 2024 मधील सर्वात लांब षटकार, दोनच दिवसात मोडला इशान किशनचा विक्रम

यानंतर सोशल मीडियावर या दोन खेळाडू गळाभेट घेतानाचा फोटो व्हायरल झाला असून तो वापरून अनेक मजेशीर मीम्स पोस्ट केल्या जात आहेत. यातच दिल्ली पोलीसांनी देखील जागरूकता पसरवणारा संदेश देत एक मजेशीर पोस्ट केली आहे.

Virat Kohli-Gautam Gambhir Photo
IPL 2024 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ...? आयपीएल 2024 मधील सर्वात प्रसिद्ध संघाच्या यादीत मुंबईची झाली घसरण

फोटोमध्ये गंभीर आणि कोहली खांद्याला खांदा लावून एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत. तर X वर शेअर केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये पोलिसांनी लिहिले की, 112 कोणत्याही समस्येत मदत करण्यास तयार आहे. त्याचवेळी, गंभीर-कोहलीच्या फोटोवर, भांडण झालंय? 112 डायल करा आणि भांडण सोडवा! कोणतंही भांडण 'विराट' किंवा 'गंभीर' नाहीये.

दिल्ली पोलिसांच्या या पोस्टला आतापर्यंत जवळपास साडेसात हजार लाईक्स मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी ते पाहिले आहे. या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी त्याच्या डायल 112 सेवेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या पोस्टवर लोकांनी अनेक मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.