RCB vs GT : टीम इंडियाची चिंता मिटली! 'विराट' खेळीने कोहली आला फार्मात

Virat Kohli Glenn Maxwell Shine Royal Challengers Bangalore Defeat Gujarat Titans
Virat Kohli Glenn Maxwell Shine Royal Challengers Bangalore Defeat Gujarat TitansESAKAL
Updated on

मुंबई : विराट कोहलीने मोठ्या सामन्यात मोठी खेळी करत आरसीबीला नितांत गरजेचा विजय मिळवून दिला. विराटच्या 73 धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरातचे 169 धावांचे आव्हान 8 गडी राखून पार केले. गुजरातकडून राशिदने दोन विकेट घेतल्या. तर फाफ ड्युप्लेसिसने 44 धावांचे योगदान दिले. तर ग्लेन मॅक्सवेलने 18 चेंडूत नाबाद 40 धावा चोपल्या. त्यानेच आरसीबीच्या विजयाला तकाखेबाज तडका दिला. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार 62 धावा केल्या. आरसीबी या विजयानंतर गुणतालिकेत 16 गुण मिळवत चौथ्या स्थानावर पोहचली आहे. (Virat Kohli Glenn Maxwell Shine Royal Challengers Bangalore Defeat Gujarat Titans in must Win Match IPL 2022)

Virat Kohli Glenn Maxwell Shine Royal Challengers Bangalore Defeat Gujarat Titans
वीस वर्षे माझे रेकॉर्ड कोणी मोडले नाही म्हणत अख्तरने उमरानला दिला खास सल्ला

गुजरातचे 169 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीने दमदार सुरूवात केली. विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने दमदार सलामी दिली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये आरसीबीला 55 धावांपर्यंत पोहचवले. यात विराटचा 34 धावांचा वाटा होता. पॉवर प्लेनंतर सावध खेळत असलेल्या फाफ ड्युप्लेसिसने गिअर बदलला.

दरम्यान विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण करत आपण फॉर्ममध्ये परतत असल्याचे मोठे संकेत दिले. या दोघांनी 12 व्या षटकात नाबाद शतकी मजल मारली. दरम्यान, फाफ ड्युप्लेसिस आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला असाताना राशिद खानने त्याला 44 धावांवर बाद केले. दुसरीकडे विराट कोहलीने सत्तरी पार केली होती. तर आरसीबी 150 च्या उबरठ्यावर होती. मात्र राशिदने आरसीबीला अजून एक धक्का दिला. त्याने विराट कोहलीला 73 धावांवर बाद केले.

विराट बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने 18 चेंडूत 40 धावा चोपत गुजरातच्या 169 धावा 18.4 षटकात पार केले.

Virat Kohli Glenn Maxwell Shine Royal Challengers Bangalore Defeat Gujarat Titans
VIDEO : निराश मॅथ्यू वेडची पॅव्हेलिनमध्येच आदळ आपट

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरात टायटन्सला जॉस हेजलवूडने पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर शुभमन गिलला अवघ्या 1 धावेवर बाद केले. यंदाच्या आयपीएलमध्ये मॅथ्यू वेडला फार मोठी खेळी करता आलेली नाही. आजच्या आरसीबी विरूद्धच्या सामन्यात देखील तो 13 चेंडूत 16 धावा करून ग्लेन मॅक्सेवलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

सलामीला आलेल्या वृद्धीमान साहाने 22 चेंडूत 31 धावांची खेळी केली. मात्र फाफ ड्युप्लेसिसने त्याला धावबाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला. गुजरातच्या स्वस्तात तीन विकेट गेल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र त्यानंतर डेव्हिड मिलर 34 धावांची भर घालून परतला. दरम्यान, हार्दिकने आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

मात्र त्याला साथ देण्याासाठी आलेला राहुल तेवतिया 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर आलेल्या राशिद खानने स्लॉग ऑव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 6 चेंडूत 19 धावा चोपून गुजरातला 168 धावांपर्यंत पोहचवले. दुसऱ्या बाजूला कर्णधार हार्दिक पांड्याने 47 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.