Virat Kohli Captaincy : कर्णधार म्हणून मी खूप चुका केल्या... विराट कोहलीने दिली प्रांजळ कबुली

Virat Kohli Captaincy
Virat Kohli Captaincy esakal
Updated on

Virat Kohli Captaincy : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीनंतर टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वकाळात जरी भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नसली तरी विराटसेनेने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. विराट कोहली आपल्या खेळाडूच्या मागे आक्रमकपणे उभा राहत होता. त्यामुळे संघ आत्मविश्वासाने भरलेला असायचा. विराट कोहलीने 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये देखील भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच तो दिल्लीचा देखील कर्णधार होता.

Virat Kohli Captaincy
WTC Final 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली WTC फायनलमध्ये हा खेळाडू बनणार टीम इंडियाचा उपकर्णधार!

दरम्यान, विराट कोहलीने एका मुलाखतीत खुलासा केला की त्याने कर्णधार म्हणून अनेक चुका केल्या आहेत. हे मान्य करायला त्याला कोणताही लाज वाटत नाही. विराट म्हणतो की मी जे केले त्यामागे माझा उद्येश हा संघाच्या हिताचाच होता.

डिस्ने हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली म्हणतो की, 'मी कर्णधार असताना चुका केल्या हे मान्य करायला मला लाज वाटत नाही. मात्र मला एक गोष्ट माहिती होती की मी कोणतीही गोष्ट ही माझ्या स्वार्थासाठी केली नाही. संघाला पुढं घेऊन जायचं हा माझा एकच उद्येश होता. अपयश येत होती मात्र आमचा उद्येश कधीही चुकीचा नव्हता.'

Virat Kohli Captaincy
IPL 2023 Points Table: गुजरात टायटन्स होऊ शकतात बाहेर! मुंबई इंडियन्सने बिघडवले सर्व संघांचे समीकरण

विराट कोहलीने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करतोय. विराट कोहली सध्या आयपीएलचा 16 वा हंगाम खेळथ आहे. रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून खेळताना त्याने धावांचा रतीब घातला आहे. विराट आरसीबीचा देखील कर्णधार होता. मात्र त्याने 2021 च्या आयपीएल हंगामात आरसीबीचे नेतृत्व सोडले होते.

यंदाच्या हंगामात विराट कोहलीने आतापर्यंत 11 सामन्यात 42.00 च्या सरासरीने 420 धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट हे 133.76 इतके आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.