Virat Kohli: 'आम्ही भारतात नव्हतो, तर...', दोन महिन्यांची विश्रांती अन् मुलाचा जन्म, अखेर विराट झाला व्यक्त

Virat Kohli on Birth of Son: विराट कोहलीने आयपीएलपूर्वी त्याच्या मुलाच्या जन्मावेळी दोन महिन्यांची सुटी घेतली होती, याबद्दल आता त्याने भाष्य केले आहे.
Virat Kohli | Anushka Sharma
Virat Kohli | Anushka SharmaSakal
Updated on

Virat Kohli News: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सोमवारी (25 मार्च) इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामातील (IPL 2024) पहिल्या विजयाची नोंद केली. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बेंगळुरूने सोमवारी पंजाब किंग्स संघाचा पराभव केला.

बेंगळुरूच्या या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीने मोलाचा वाटा उचलला. पंजाबने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून विराट कोहलीने 49 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी केली.

दरम्यान, विराटने दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर या आयपीएल हंगातमातून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने त्याच्या मुलाच्या जन्मासाठी दोन महिने विश्रांती घेतली होती. त्यामुळे तो जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतीही खेळला नव्हता.

Virat Kohli | Anushka Sharma
Virat Kohli: 'माझं नाव टी20 क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी जगभरात...', RCB च्या पहिल्या विजयानंतर विराट स्पष्टच बोलला

विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना 15 फेब्रुवारी 2024 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले, ज्याचे नाव त्यांनी अकाय असे ठेवले आहे. विराट आणि अनुष्का यांचे हे दुसरे अपत्य आहे. त्यांना वामिका नावाची 3 वर्षांची मुलगीही आहे.

दरम्यान, विराटने सोमवारी पंजाब किंग्सविरुद्ध सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याच्या मुलाच्या जन्माबद्दल आणि त्यासाठी त्याने घेतलेल्या 2 महिन्यांच्या विश्रांतीबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे.

तो म्हणाला, 'आम्ही भारतात नव्हतो. आम्ही अशा ठिकाणी होतो, जिथे लोक आम्हाला ओळखत नाहीत. सर्वसामन्यपणे एक कुटुंब म्हणून जगण्यासाठी हा वेळ आम्हाला एकत्र घालवायचा होता. आमच्यासाठी हा एक अप्रतिम अनुभव होता.'

Virat Kohli | Anushka Sharma
IPL 2024 mi vs gt : मुंबईच्या सामन्यात हार्दिकची हुर्यो ; आयपीएल : गुजरात टायटन्सचा सहा धावांनी निसटता विजय

याशिवाय हर्षा भोगले यांच्याबरोबरच्या मुलाखतीत विराट याबद्दल म्हणाला, 'नक्कीच दोन मुलं झाल्यानंतर कुटुंब म्हणून अनेक गोष्टी बदलतात. एकत्र असताना तुमच्या मोठ्या अपत्याबरोबर तुमचे जे नाते तयार होते, ते खूप अविश्वसनीय असते. मला असं म्हणायचंय की मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे.'

त्याचबरोबर विराटने असेही सांगितले की दोन महिने लोकांमध्ये अनोळखी म्हणून राहिल्यानंतर पुन्हा ओळखीच्या ठिकाणी येणे आणि तुमच्या नावाच्या घोषणा ऐकणे, हा एक वेगळा अनुभव होता.

दरम्यान, विराटव्यतिरिक्त सोमवारी बेंगळुरूकडून दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी नाबाद 48 धावांची भागीदारी केली आणि अखेरच्या षटकात बेंगळुरूचा विजय निश्चित केला. बेंगळुरुने 19.2 षटकात 6 बाद 178 धावा केल्या.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.