Virat Kohli : चेंडू कमरेच्या वर असतानाही विराटला का दिला आऊट, काय आहे नियम? डोके न खाजवता समजून घ्या

Virat Kohli no ball Controversy : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अवघ्या 1 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा बनला तो म्हणजे विराट कोहलीची विकेट.
Virat Kohli no ball Controversy
Virat Kohli no ball Controversy News Marathisakal
Updated on

Virat Kohli no ball Controversy : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अवघ्या 1 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा बनला तो म्हणजे विराट कोहलीची विकेट.

हर्षित राणाच्या चेंडूवर विराटने नो बॉलसाठी अपील केले, पण डीआरएसनंतर तिसऱ्या पंचांनी ही त्याला आऊट दिले. तेव्हापासून या बॉलवरून वाद सुरू झाला आहे. चेंडू कंबरेपेक्षा जास्त वर असूनही विराटला आऊट दिले असे क्रिकेट चाहत्यांसोबतच माजी खेळाडू पण म्हणत आहेत.

Virat Kohli no ball Controversy
IPL 2024 : सामना हरल्यानंतर RCB अन् पंजाबच्या कर्णधारांवर कडक कारवाई! BCCI ने ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंड

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 6 गडी गमावून 222 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीने आरसीबीला शानदार सुरुवात करून दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावातील तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हर्षित राणाने विराट कोहलीला एक फुल टॉस बॉल टाकला, जो कोहलीला पण लवकर समजू शकला नाही आणि चेंडू त्याच्या बॅटला लागून हार्दिक राणाच्या हातात गेला. पहिल्यांदा पहिल्यानंतर तो नो बॉल असल्याचं दिसत होतं, पण रिप्ले पाहून थर्ड अंपायरने कोहलीला आऊट दिले.

Virat Kohli no ball Controversy
IPL 2024 Playoffs Scenario RCB : मुश्किल है पर नामुमकिन नहीं...! 'या' समीकरणामुळं RCBला मिळू शकतं प्लेऑफचं तिकीट

नियम काय म्हणतो?

आयपीएल 2024 मध्ये नवीन हॉक-आय बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरले जात आहे. यामध्ये खेळाडूंच्या कंबरेची उंची आधीच मोजण्यात येते. अशा परिस्थितीत एखाद्या सामन्यादरम्यान जेव्हा गोलंदाज फुल टॉस बॉल करतो, तेव्हा या नवीन तंत्रज्ञानाद्वारे फलंदाजाच्या कंबरेच्या उंचीनुसार, चेंडू फुल टॉस आहे की नाही आहे हे सांगितले जाते.

जर बॉल कमरेच्या उंचीपेक्षा जास्त वर असेल तर अंपायर त्याला नो बॉल घोषित करतो. जर चेंडू कंबरेच्या उंचीच्या खाली असेल तर तो बॉल असतो. यामध्ये फलंदाजाला क्रीजमध्ये असणे अनिवार्य आहे.

Virat Kohli no ball Controversy
Virat Kohli no ball Controversy sakal

पण विराट कोहलीच्या बाबतीत काय झालं?

विराट कोहलीच्या बाबतीत असे झाले की तो क्रीजच्या बाहेर गेला होता. आणि जेव्हा बॉलचा त्याच्या बॅटशी संपर्क झाला तेव्हा चेंडू त्याच्या कमरेच्या वर होता, पण टीव्ही अंपायर मायकेल गफ यांना दिसले की विराट क्रीझच्या बाहेर आहे. आणि जर तो क्रीझच्या आत राहिला असता तर चेंडू त्याच्या कमरेच्या खाली राहिला असता.

विराट कोहलीच्या कमरेची उंची 1.04 मीटर मोजण्यात आली आहे. जर त्याने तो चेंडू क्रीजमध्ये उभा राहून खेळला असता तर चेंडूची उंची केवळ 0.92 मीटर राहिली असती, जी त्याच्या कमरेच्या उंचीपेक्षा कमी आहे. त्यामुळे चेंडू कंबरेच्या वर असूनही तिसऱ्या पंचाने विराट कोहलीला आऊट दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.