Virat Kohli : विराट कोहली आला रे...! RCB च्या ताफ्यात लवकरच होणार दाखल, जाणून घ्या पहिला सामना कधी खेळणार?

Virat Kohli returns to India : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी मुलाच्या जन्मासाठी परदेशात गेलेला विराट कोहली रविवारी भारतात परतला.
Virat Kohli
Virat Kohlisakal
Updated on

Virat Kohli returns to India : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी मुलाच्या जन्मासाठी परदेशात गेलेला विराट कोहली रविवारी भारतात परतला. आयपीएलसाठी लवकरच तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघात दाखल होईल. आयपीएल २२ तारखेपासून सुरू होत असून पहिल्याच दिवशी बंगळूरचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे.

Virat Kohli
कोहलीला T20 World Cup मधून बाहेर काढण्याचा जय शाहांचा प्लॅन; दिग्गज खेळाडूचा BCCI सचिवांवर मोठा आरोप

खरे तर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका विराट कोहली खेळणार होता. सलामीच्या सामन्यासाठी तो हैदराबादमध्ये दाखलही झाला होता; परंतु अचानक त्याने माघार घेतली. वैयक्तिक कारणासाठी विराट कोहली माघार घेत असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले होते. त्यामुळे विराटने नेमकी कशामुळे माघार घेतली हे कारण गुपित होते.

Virat Kohli
Hardik Pandya : 'मी इंजेक्शनवर इंजेक्शन घेतले, पण...' वर्ल्ड कपमधील दुखापतीवर हार्दिक पांड्याचा मोठा खुलासा

विराटने आपल्याला पुत्ररत्न झाल्याचे जाहीर केले. मुलाच्या जन्मानंतरही तो लंडनमध्येच होता. आज रविवारी सकाळी तो मुंबईत दाखल झाला. प्रदीर्घ कालावधीनंतर विराट क्रिकेटच्या मैदानात पुन्हा दिसणार आहे. शानदार कामगिरी करून बंगळूर संघाला अद्याप एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संपूर्ण टीम -

यष्टिरक्षक : अनुज रावत, दिनेश कार्तिक.

फलंदाज : फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका), फिन ऍलन (न्यूझीलंड), विराट कोहली, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक (इंग्लंड).

अष्टपैलू : वानिंदू हसरंगा (श्रीलंका), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), शाहबाज अहमद, सोनू यादव, मनोज भंडागे.

गोलंदाज : आकाश दीप, जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया), सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, डेव्हिड विली (इंग्लंड), अविनाश सिंग, राजन कुमार, रीस टोपली (इंग्लंड), हिमांशू शर्मा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.