Virat Kohli: क्रिकेटमध्ये नव्या कोहलीची एंट्री होतेय ? लेकीच्या बॅट फिरवण्याबद्दल काय म्हणाला विराट, पाहा Video

Virat Kohli Daughter: विराट कोहलीने नुकतेच आपल्या मुलीच्या आवडीबद्दल भाष्य केले असून त्याचा व्हिडिओ रॉयल चॅलेजर्स बेंगळुरूने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Virat Kohli Daughter
Virat Kohli DaughterEsakal
Updated on

Virat Kohli Daughter: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी आयपीएल २०२४ हंगाम संमिश्र राहिला. पण असे असले तरी बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी मात्र हा हंगाम वैयक्तिकरित्या शानदार राहिला आहे.

तो या हंगामात सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. दरम्यान, नुकताच त्याचा एक व्हिडिओ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट बेंगळुरू फ्रँचायझीसाठी मिस्टर नॅग्सची भूमिका निभावणाऱ्या दानिश सैतला मुलाखत देत आहे. या मुलाखतीदरम्यान विराटने त्याची मुलगी वामिकाबद्दल भाष्य केले आहे.

Virat Kohli Daughter
IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

दानिशने आधी विराटला त्याचा नवजात मुलगा अकायबद्दल विचारले. विनोदी कलाकार असलेल्या दानिशने विराटला विचारले, पापू कसाय, ज्यावर विराटने पापू कोण असा प्रश्न विचारला.

त्यावर दानिश म्हणाला, पापू म्हणजे बाळ. त्यावर विराटने नंतर उत्तर दिले की 'बाळ एकदम छान आहे, निरोगी आहे आणि सर्वकाही चांगलं आहे.' त्यावर दानिशने त्याला गमतीने म्हटले की 'एक बाळ आयपीएलसाठी आणि एक बाळ डब्ल्युपीएलसाठी.'

दानिशच्या या कमेंटवर विराटलाही हसू आवरता आले नाही. नंतर विराटने स्वत:च खुलासा केला की वामिकाला बॅट फिरवायला आवडते. तो म्हणाला, 'आमची मुलगी बॅट उचलते आणि तिला बॅट फिरवायला खूप मजा पण येते. पण मी काही म्हणू शकत नाही, कारण अंतिम निर्णय त्यांना घ्यायचाय की काय करायचे आहे.'

Virat Kohli Daughter
SRH vs GT: सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारन अन् विलियम्सनचं रियुनियन, सनरायझर्स हैदराबादन शेअर केला खास Video

विराटची मुलगी वामिका सध्या साडेतीन वर्षाची आहे, तर मुलगा अकायचा जन्म 15 फेब्रुवारी 2024 रोजी झाला आहे.

विराट शानदार फॉर्ममध्ये

दरम्यान, विराट सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल 2024 स्पर्धेत 13 सामन्यांत 65.10 च्या सरासरीने 661 धावा केल्या आहेत, यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाबद्दल सांगायचं झाले तर त्यांनी पहिल्या 8 सामन्यांत 7 पराभव स्विकारल्यानंतर सलग 5 विजय मिळवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.