Cricketers Fan Breached Security: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने जिंकला. बेंगळुरूने सोमवारी (25 मार्च) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सला 4 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यादरम्यान विराट कोहलीचा एक चाहता अचानक स्टेडियममध्ये घुसला होता.
झाले असे की या सामन्यात पंजाबने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून विराट कोहली फलंदाजी करत होता. यावेळी एक प्रेक्षक स्टेडियमची सुरक्षा भेदत थेट मैदानात आला.
मैदानात आल्यानंतर तो विराटच्या दिशेने पळत निघाला आणि त्याने जाऊन विराटला मिठी मारली आणि त्याच्या पाया पडला. यादरम्यान लगेचच सुरक्षारक्षक मैदानात आले आणि त्यांनी त्या प्रेक्षकाला मैदानातून बाहेर नेले.
दरम्यान, स्टेडियमची सुरक्षा भेदत प्रेक्षकांनी मैदानात येऊन अशाप्रकारे खेळाडूंची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी असे अनेक क्रिकेटपटूंच्या बाबतीत घडले आहे. विशेषत: भारतात अनेकदा असा प्रकार घडला आहे. त्यामुळे काही प्रेक्षकांवर कारवाईही झाली आहे.
विराट व्यतिरिक्त भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्याबाबतही अनेकदा असं झाले असून नुकतेच जानेवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यानही एका प्रेक्षकाने स्टेडियमची सुरक्षा भेदत स्टेडियममध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्याने मैदानात येत रोहित शर्माची भेट घेतली होती.
इतकेच नाही, तर भारताचे अनेक खेळाडू लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते भारतातच नाही, तर जगभरात पाहायला मिळतात. यात माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे. अनेकदा प्रेक्षकांनी त्यालाही भेटण्यासाठी मैदानातील सुरक्षा तोडली आहे.
एक व्हिडिओ असाही व्हायरल झाला होता, जेव्हा एका प्रेक्षकाने मैदानात धोनीला भेटण्यासाठी प्रवेश केलेला तेव्हा धोनीने त्याच्याबरोबर मस्ती करत त्याला मैदानात पळवले होते.
2018 साली झालेल्या आयपीएलमध्येही राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अंजिंक्य रहाणेच्या एका चाहत्याने त्याला भेटण्यासाठी स्टेडियमची सुरक्षा मोडली होती.
दरम्यान, इंग्लंडमधील जार्वो नावाने ओळखला जाणाऱ्या एका व्यक्तीनेही भारताच्या 2021 मधील इंग्लंड दौऱ्यात अनेकदा मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे हा व्यक्ती 2023 वनडे वर्ल्डकपवेळीही भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मैदानात घुसला होता. यानंतर आयसीसीने त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.