Virat Kohli Sachin Tendulkar : दिग्गजांच्या कानगोष्टी! सामन्यापूर्वी विराट - सचिनची भेट अन् तर्क वितर्कांना उधाण

Virat Kohli Sachin Tendulkar
Virat Kohli Sachin Tendulkaresakal
Updated on

Virat Kohli Sachin Tendulkar : आयपीएलच्या 54 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर बेंगलोर मुंबईला मुंबईत जाऊन आव्हान देणार आहे. यासाठी आरसीबीचा संघ मुंबईत दाखल झाला असून सामन्यापूर्वी आरसीबीचा स्टार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकर यांच्या ग्रेट भेट झाली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिायवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट कोहली द ग्रेट सचिन तेंडुलकरच्या कानात काही सांगताना दिसतोय.

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली मैदानावरील आपल्या आक्रमक कृत्यांसाठी चांगलाच चर्चेत आला होता. त्याने लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात आधी नवीन उल हक, अमित मिश्रा आणि नंतर गौतम गंभीरशी भिडला होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यातील विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील हस्तांदोलन देखील गाजले.

Virat Kohli Sachin Tendulkar
ODI World Cup 2023 IND vs PAK : आशिया कप आयोजन हातातून गेल्यानंतर पाकिस्तान वनडे वर्ल्डकपमध्ये पाय आडवा घालण्याच्या तयारीत

दरम्यान, आजच्या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे एकमेकांना भेटले. यावेळी दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले तसेच विराट कोहली सचिनशी बोलताना एका वेगळ्याच मूडमध्ये दिसला. खूष असलेला विराट सचिनच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी गप्पा मारत होता, हसत होता तसेच सचिनच्या कानात काहीतरी सांगत होता. हेच क्रिकेट रसिकांनी नेमके हेरले आणि विराट सचिनच्या कानात काय सांगतोय याचे तर्कवितर्क लढवू लागले. विराट ज्या कारणांनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता त्याबद्दलच विराट सचिनच्या कानात काहीतरी सांगत नसेल ना?

Virat Kohli Sachin Tendulkar
Team India : BCCI अन् कर्णधार रोहितने संपवली 'या' 2 दिग्गज खेळाडूंची कारकीर्द!

आजच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी 10 सामने खेळले आहे. या दोघांनाही यापैकी 5 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराजय स्विकारावा लागला आहे. या दोन्ही संघांचे प्रत्येकी 10 असे सामना गुण झाले आहेत. मात्र आरसीबीचे नेट रनरेट हे -0.209 आहे तर मुंबई इंडियन्सचे -0.454 आहे. त्यामुळे आरसीबी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे तर मुंबई आठव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकून गुणतालिकेत 12 गुणांसह तिसरे स्थान गाठण्याची संधी आहे. या संधीचे कोण सोनं करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.