Virat Kohli, RCB News: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या महिला संघाने नुकतेच वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. बेंगळुरू फ्रँचायझीचे हे गेल्या 16 वर्षातील पहिले विजेतेपद ठरले आहे. यापूर्वी या फ्रँचायझीला कोणत्याच स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आलेले नव्हते. त्यामुळे या फ्रँचायझीमधील पुरुष खेळाडूंनी महिला संघावर स्तुतीसुमने उधळली.
बेंगळुरूचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील महिला बेंगळुरू संघाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याने बेंगळुरू फ्रँचायझीच्या चाहत्यांचेही कौतुक करताना म्हटले की जर आयपीएलही जिंकलो, तर ते खूप विशेष असेल.
मंगळवारी (19 मार्च) बेंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये या संघाचा आरसीबी अनबॉक्स हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुरुष संघाने डब्ल्युपीएल विजेत्या महिला संघाला गार्ड ऑफ ऑनरही दिला.
यावेळी महिला संघाच्या यशाबद्दल बोलताना विराट म्हणाला, 'खूप मस्त, खूपच छान. जेव्हा ते जिंकले, आम्ही सर्वजण पाहत होतो. तो क्षण असा होता, जेव्हा तुम्हाला तुमचा चाहतावर्ग कित शानदार आहे, याची जाणीव होते. त्यांची खरी क्षमता जाणवते. मी असं म्हणतोय, कारण तेव्हा असं वाटलं की संपूर्ण शहर जिंकले आहे.'
'आरसीबी संघ जेवढे सामने खेळले, तेव्हा ज्याप्रकारे चाहते स्टेडियममध्ये आले होते, ते पाहा. त्यात काहीच तुलनाच होऊ शकत नाही. अंतिम सामन्यासाठीही साधारण 30 हजार लोक होते. मी असंही ऐकलं की जेव्हा इथे संघ सामने खेळला, तेव्हाही संपूर्ण स्टेडियम भरलेले होते.'
विराट चाहत्यांबद्दलही पुढे म्हणाला, 'चाहत्यांचे प्रेम मिळवायला बराच काळ जावा लागतो, ही गोष्ट अशी आहे, जी तुम्ही दोन वर्षात कमावू शकत नाही. त्यामुळे चाहत्यांचे हे 16 वर्षांचे प्रेम, प्रामाणिकता आणि समर्पण आहे.'
'समर्पण आणि जिद्दच आहे, ज्यामुळे आम्ही इतकेवर्षे क्रिकेट खेळत आहोत. हे कधीही बदलू शकत नाही. आणि मी माझे प्रत्येकवर्षी असेच समर्पण देत राहिल. आशा आहे की आम्ही ट्रॉफीची संख्या दुप्पट करू. जर असे झाले (आयपीएल जिंकले) तर ते खरंच खूप विशेष असेल.'
आयपीएल जिंकण्याबद्दल विराट म्हणाला, 'मी संघाबरोबरच असेल. पहिल्यांदा आयपीएल जिंकणाऱ्या संघातही मी राहण्याचा प्रयत्न करेल. चाहत्यांसाठी आणि फ्रँचायझीसाठी मी माझे सर्वोत्तम देण्याबरोबरच माझ्या क्षमतेनुसार आणि अनुभवाचा फायदा घेऊन संघाला जिंकून देण्याचा प्रयत्न करेल.'
'आयपीएल जिंकल्यानंतर कसे वाटते, हे अनुभवण्याचे माझे खूप वर्षांपासूनचे स्वप्न आहे. त्यामुळे आशा आहे की हे स्वप्न यंदा पूर्ण होईल.'
दरम्यान, आगामी आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघात चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याने आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.