Virat Kohli: 'माझं नाव टी20 क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी जगभरात...', RCB च्या पहिल्या विजयानंतर विराट स्पष्टच बोलला

RCB vs PBKS: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. यावेळी त्याने त्याच्या टी20तील कौशल्यावर टीका करणाऱ्यांनाही उत्तर दिले.
Virat Kohli | RCB | IPL 2024
Virat Kohli | RCB | IPL 2024Sakal
Updated on

Virat Kohli News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने पंजाब किंग्सविरुद्ध 4 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. बेंगळुरूचा हा या हंगामातील पहिलाच विजय आहे.

या विजयात बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

याबरोबरच त्याला आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा नावावर असलेल्या खेळाडूला दिली जाणारी ऑरेंज कॅपही त्याला देण्यात आली. यावेळी बोलताना विराटने त्याच्या टी२० क्रिकेट खेळण्यावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिले आहे.

Virat Kohli | RCB | IPL 2024
RCB vs PBKS : विराट कोहलीने मोडला 'मिस्टर IPL'चा मोठा विक्रम अन् रचला इतिहास!

सामन्यानंतर विराट म्हणाला, 'खुप उत्साही आत्ताच होऊ नका, कारण फक्त दोनच सामने झालेत. मला माहित आहे ऑरेंज कॅप मिळवण्याचे काय महत्त्व आहे. लोक खेळाबद्दल खूप चर्चा करतात.'

'मात्र दिवसाच्या शेवटी तुम्ही यश, आकडेवारी, विक्रम यांबद्दल बोलत नाही, तर तुम्ही तयार केलेल्या आठवणींबद्दलच चर्चा करता. असं राहुल द्रविड म्हणतो. मैत्री, प्रेम, कौतुक, पाठिंबा हेच महत्त्वाचे आहे आणि जे तुम्ही विसरत नाही.'

दरम्यान, या सामन्यात पंजाबने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या बाजूने झटपट विकेट्स पडल्याने त्याला परिस्थितीनुसार संयमी खेळ करावा लागले.

Virat Kohli | RCB | IPL 2024
IPL 2024 Schedule : BCCI ची घोषणा अन् चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला! १२ वर्षांनंतर चेन्नईमध्ये रंगणार IPL फायनलचा थरार

याबद्दल विराट म्हणाला, 'टी20 क्रिकेटमध्ये मी सलामीला फलंदाजी करतो. त्यामुळे मी आक्रमक सुरुवात देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, जेव्हा विकेट्स जातात, तेव्हा परिस्थितीनुसार खेळावे लागते.'

'खेळपट्टी नेहमीप्रमाणे फारशी पाटा नव्हती. ऍक्रॉस द लाईन जाऊन चेंडू फटकावता येत नव्हता. सामना संपवू शकलो, याबद्दल निराश आहे, पण सुरुवात चांगली राहिली. जर गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असतील, तर तुम्हाला संयमी राहुन लय मिळवावी लागते.'

याबरोबरच विराटने असेही म्हटले की अद्याप त्याच्याकडे टी20 क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी कौशल्य आहेत. तो म्हणाला, 'मला माहित आहे जेव्हाही टी20 क्रिकेटची गोष्ट येते तेव्हा माझे नाव आजकाल जगभरात टी२० चा प्रचार करण्यासाठी वापरले जाते. मला असे वाटते की माझ्याकडे ते कौशल्य अजूनही आहे.'

खरंतर काही दिवसांपूर्वीच असे रिपोर्ट्स समोर आले होते की जून 2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी विराटच्या भारतीय संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह आहे. जर त्याची आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी राहिली, तर त्याचा या स्पर्धेसाठी विचार केला जाईल, असे म्हटले जात आहे.

विराटचा बेंगलोरच्या विजयात मोलाचा वाटा

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या होत्या. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या आहेत. बेंगळुरूकडून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून विराट कोहलीने 49 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी केली.

तसेच विराट बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी नाबाद आक्रमक 48 धावांची भागीदारी करत बेंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बेंगळुरुने 19.2 षटकात 6 बाद 178 धावा केल्या. पंजाबकडून कागिसो रबाडा आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.