Virat Kohli Mothers Day : विराट कोहलीने तिघींचा फोटो शेअर करत दिल्या मदर्स डेच्या शुभेच्छा

Virat Kohli Mothers Day
Virat Kohli Mothers Dayesakal
Updated on

Virat Kohli Mothers Day : रॉयल चॅलेंजर बेंगलोर आज अत्यंत महत्वाच्या अशा दोन गुणांसाठी राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. आरसीबीचे सध्या 10 गुण झाले आहेत. त्यांना प्ले ऑफसाठीचे आपले आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर आजचा सामना जिंकावाच लागणरा आहे.

दरम्यान, करो या मरो सामन्यापूर्वी विराट कोहलीने वेळात वेळ काढून मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. त्याने यावेळी आपली आई आणि अनुष्काचा देखील फोटो शेअर केला. संपूर्ण जग मदर्स डे जोरात सेलिब्रेट करत आहे. मग भारताचा माजी कर्णधार कसा मागे राहील. त्याने आपल्या कुटुंबातील सर्व आईंचा सन्मान केला.

Virat Kohli Mothers Day
WTC Final: ऑस्ट्रेलियाला फुटला घाम! टीम इंडियाच्या नवीन उपकर्णधाराने WTC फायनलपुर्वी घातला धुमाकूळ

विराट कोहलीने ट्विटरवर आपली आई सरोज कोहली आणि अनुष्का शर्माचा फोटो शेअर केला. याला 'हॅप्पी मदर्स डे असे कॅप्शन देत अनुष्काला टॅग केले.

यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या यातील एक कमेंट 'इतनी बड़ी दुनिया में, जो कुछ भी दृश्यमान है, मुझे नहीं लगता, माँ से अधिक कोई बलवान है! — प्रतीक द्विवेदी' सर्वात लक्षवेधी ठरली.

Virat Kohli Mothers Day
IPL 2023 : संघासाठी सर्वाधिक धावा करूनही पंचाशी पंगा घेणं भोवले: BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आरसीबी पराभवाची हॅट्ट्रिक रोखाण्यासाठी जोर लावले. त्यांना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यविरूद्धच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने आपल्या गेल्या सामन्यात केकेआरचा 9 विकेट्स राखून पराभव केला होता. त्यांनी हा विजय सलग तीन पराभवानंतर प्राप्त केला. या विजयात यशस्वी जैसवालच्या 47 चेंडूत केलेल्या 98 धावांच्या दमदार खेळीचा मोठा वाटा होता. कर्णधार संजू सॅमसनने देखील 150 धावांचा पाठलाग करताना 29 चेंडूत 48 धावा केल्या होत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.