Virat Kohli Team India Captain : यंदाच्या आयपीएल हंगामात विराट कोहली आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला असून तो जवळपास प्रत्येक सामन्यात अर्धशतकी खेळी करत आहे. यातच फाफ ड्युप्लेसिस दुखापतग्रस्त झाल्यावर त्याने आरसीबीच्या नेतृत्वाची धुरा देखील आपल्या खांद्यावर वाहिली. यानंतर विराट कोहली आता पुन्हा टीम इंडियाचा देखील कर्णधार होणार का असा प्रश्न चाहते विचारत आहेत. याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा खुलासा केला आहे.
रवी शास्त्री यांनी मान्य केलं की इंग्लंडविरूद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत रोहित दुखापतग्रस्त होता त्यावेळी विराट कोहलीने टीम इंडियाचे नेतृत्व करावे अशी त्यांची अपेक्षा होती. बर्मिंगहॅम कसोटीत रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहने केले होते. ही रिशेड्युल केलेली कसोटी होती. यापूर्वी या मालिकेतील चार कसोटी सामने विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळले गेले होते.
याबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, 'रोहित शर्मा कोरोनाची लागण झाल्यामुळे खळणार नव्हता. मला वाटले की विराट कोहली संघाचे नेतृत्व करेल. मला वाटले त्याला विचारले जावे. जर मी तिथे असतो तर मी नक्की विचारले असते. मला खात्री आहे की राहुलने देखील ही गोष्ट केली असेल. मला याबाबत काही माहिती नाही मी त्याच्याशी बोललो नाही. मात्र मी बोर्डाला त्याचीच शिफार केली असती कारण मालिकेचे नेतृत्व तोच करत होता आणि भारत मालिकेत 2 - 1 असा आघाडीवर होता. तो खेळाडूंकडून त्यांचे सर्वोत्तम काढून घेऊ शकला असता.'
इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना विराट कोहलीने त्या सामन्यासाठी संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिला असता का असे विचारल्यावर रवी शास्त्री म्हणाले की, 'नाही, देशाचे नेतृत्व करणे ही सन्मानाची बाब असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे सर्वस्व द्यायचे असते. तुमचा पूर्णवेळ कर्णधार दुखापतग्रस्त आहे. तो संघात नाहीये. तुम्हाला इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवायचे आहे. तुम्ही 2 - 1 ने आघाडीवर आहे. कितीवेळा तुम्ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला त्या वर्षात त्यांच्यात घरात जाऊन मात दिली आहे?'
जर विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले असते तर हे शक्य झालं असतं. असे या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये असं होईल? रवी शास्त्री विराट पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार होईल हा आशावाद बाळगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.